खळबळजनक ! उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती नेहमीच उसाला राहिलेली आहे. मात्र उसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या समोरील समस्या काही कमी नाहीत. उसाची तोडणी मशीनने करणे हे सर्वच शेतकऱ्यांना परवडते असे नाही त्यामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र ऊस तोडणी कामगारांकडून केवळ शेतकऱ्यांची नाही तर वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. ही रक्कम साधी सुधी नसून आत्तापर्यंत तब्बल साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. साखर आयुक्तालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ऊस तोडणाऱ्या टोळीने वाहतूकदार किंवा कारखानदारांना फसवणे हे आता नवीन राहिलं नाही. मात्र, याबाबतची जी आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक आहे आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना ऊसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळं शेती क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

2004 पासून 2020 पर्यंत राज्यातील 81 साखर कारखांन्याची उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवणूक केली आहे. ही फसवणूक तब्बल 39 कोटी 46 लाख रुपयांची असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

संदर्भ -एबीपी माझा

Leave a Comment

error: Content is protected !!