Export Of Fruits And Vegetables : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । केळी, आंबा, डाळिंब आणि जॅकफ्रूट यांसारख्या विविध फळे आणि भाजीपाला सागरी मार्गाने निर्यात (Export Of Fruits And Vegetables) करण्यासाठी भारत एक नियमावली तयार करत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. सद्यस्थितीत निर्यात करण्यात येणारा बहुतांश माल हा कमी प्रमाणात आणि पक्वतेच्या कालावधीमुळे हवाई मार्गाने निर्यात केला जात आहेत. परंतु येणाऱ्या काही दिवसात सागरी मार्गाने फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात होणार आहे.

काय आहे नियमावली? Export Of Fruits And Vegetables

या नियमावलीमध्ये प्रवासाची वेळ समजून घेणे, शास्त्रोक्त पद्धतीने या मालाची पिकवण्याची पद्धत समजून घेणे, विशिष्ट वेळी कापणी करणे आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे समाविष्ट आहे. वेगवेगळ्या फळे आणि भाज्यांसाठी ही नियमावली वेगवेगळे असणार आहे.

वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, सागरी मार्गाने निर्यात (Export Of Fruits And Vegetables) करण्याचे दोन फायदे आहेत (प्रमाण आणि किंमत). यामुळे फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला चालना मिळण्यास मदत होईल कारण हवाई मालवाहतूक निर्यातीचा या वस्तूंच्या किंमतीच्या स्पर्धात्मकतेवर सकारात्मक परिणाम होतो. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत आम्ही या नाशवंत उत्पादनांची निर्यात करण्यासाठी हवाई मार्ग वापरत होतो. पण, आता ही कृषी उत्पादने पाठवण्यासाठी सागरी मार्गाचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता आम्ही यासाठी सागरी नियमावली विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!