सातबारा वरील जातीवाचक रकानाच हद्दपार; ग्रामपंचायतींचा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतीचे स्थानिक नाव या रकन्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. महसूल विभागाच्या याच निर्णयाला आता गावातील ग्रामपंचायती देखील साथ देऊ लागल्या आहेत. राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी हा क्रांतिकारी विचार उचलून धरला नाही तर त्यावर मार्ग क्रमणही सुरू केले. सातबारा वरील जातीचा रकाना हद्दपार करण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उचलून धरला आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सातबारा वरून जातीवाचक उल्लेख हटवण्याचे सर्वप्रथम काम अहमदनगर जिल्ह्यातील राहता आणि नेवासा तालुक्यात करण्यात आले. यात राहता येथील बाबळेश्वर व नेवासामधील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळवाडी दुमला, सुरेगाव, दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावातील ग्रामपंचायतीने या विषयाचे ठराव घेतले आहेत. हे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकतेच पाठवण्यात आले असून या ठरावांना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या गावातील सातबारा उतारावरील जातीचे नाव आता हद्दपार होणार आहेत आणि गावकऱ्यांनीही या निर्णयांचा जंगी स्वागत केलं आहे.

राहता तालुक्यातील बाभळेश्वर ग्रामपंचायतीने या विषयीचा ठराव घेतला. 7/12 उताऱ्यात शेतीचे स्थानिक नावामधील महारांचा गट नंबर असा यापू्र्वी उल्लेख करण्यात येत होता. हा उल्लेख हटवून आता आडनाव आणि गट नंबर असा उल्लेख 7/12 उताऱ्यात करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!