हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार असो व राज्य सरकार, शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा व्हावा आणि त्याचे काम सोप्प व्हावे यासाठी दोन्ही सरकारे सातत्याने प्रयत्नशील असतात. सध्या अनेक ठिकाणी शेती करताना पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो तसेच पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम शेतातील शेतमालावर होतो. त्यामुळे अनेक राज्य सरकारे सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहेत. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ठिबक, स्प्रिंकलर आणि पोर्टेबल सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी अनुदानही दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकार शेतात शेततळं बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाखाहून जास्त पैशाचे अनुदान देत आहे.
काही दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये सरकारने शेततळ्यांच्या बांधकामाच्या खर्चावरील अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे, जेणेकरून लागवडीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देता येईल. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी ९० हजार रुपये अनुदान दिले जात होते, मात्र यंदापासून यासाठी १ लाख १० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल कोणत्याही सेवा केंद्रात जायची गरज नाही आणि आपला वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च करायची आवश्यकता नाही. आजच तुमच्या मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एका क्लीक वर अर्ज करा. हॅलो कृषीवर या व्यतिरिक्त, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी यांसारख्या सुविधा १ रुपयाही खर्च न करता मिळत आहेत. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी हे अँप डाउनलोड करून Install करा.
Hello Krushi Download करण्यासाठी Click Here
शेतकऱ्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेतातच शेततळे बांधावे आणि पाण्याची साठवणूक करावी असा हेतू राजस्थान सरकारचा आहे. परंतु यासाठी सरकारने काही नियम सुद्धा निश्चित केले आहेत. त्यानुसार, फॉर्म पौंडचा आकार हा कमीत कमी ४०० आणि जास्तीत जास्त १२०० घनमीटर असावा असे सांगण्यात आले आहे. तसेच सदर शेतकऱ्याकडे कमीत कमी ०.३ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तुम्हाला हे शेततळं बांधायचं असेल तर ते दाट लोकवस्तीपासून आणि रस्त्याच्या कडेला कमीत कमी 50 फूट अंतरावर बांधाव लागेल असा नियम आहे.