Farmer Accident Insurance : शेतकऱ्यांसाठीच्या अपघात विम्याच्या 1050 दाव्यांना मंजुरी!

Farmer Accident Insurance For Farmers
xr:d:DAF6N11hWmk:2111,j:5617538323730054941,t:24040307
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व (Farmer Accident Insurance) आल्यास, त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेच्या आणखी 1 हजार 50 शेतकऱ्यांच्या दाव्यांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वरील सर्व मंजूर दाव्यापोटी शेतकऱ्यांना 20 कोटी 78 लाख रुपयांचे अनुदान (Farmer Accident Insurance) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

काय आहे ‘ही’ योजना? (Farmer Accident Insurance For Farmers)

राज्यातील शेतकऱ्यांना काही कारणास्तव अपंगत्व येते. तर कधी-कधी मृत्यू देखील ओढवतो. अशावेळी संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकरी कुटुंबात कर्ता पुरुषच नसेल किंवा अपंग असेल. तर त्या शेतकरी कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अपंग किंवा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकारच्या वतीने आर्थिक मदत (Farmer Accident Insurance) देता यावी. या हेतूने राज्य सरकारकडून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाख रुपये, तर अपंगत्व आलेल्या शेतकरी कुटुंबाला 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

कोणाला मिळते मदत?

शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी वन्य प्राणी तर कधी नैसर्गिक संकटांच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात काम करावे लागते. परिणामी अंगावर वीज पडणे, महापूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मृत्युमुखी पडतात. याशिवाय शेतामध्ये काम करणे तितकेसे सोपे नसते. सर्पदंश, विंचूदंश यामुळे देखील शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो.

तर शेतीत काम करताना विजेशी खेळावे लागत असल्याने शेतकऱ्यांना अचानक विजेचा शॉक बसून, अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागतात. इतकेच नाही तर शेती कामानिमित्त किंवा अन्यही वेळी कुठे बाहेर गेल्यास रस्त्यावरील अपघात, वाहन अपघातात देखील शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. या आणि अन्य सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.