हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या मुलांच्या लग्नाची अवस्था खूप बिकट आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचं लग्न सहजासहजी होणं अवघड बनलय. त्यातच जर मुलगा शेतकरी असेल तर अनेक मुली आपली नाक मुरडून लग्नाला नकार देतात. मात्र अहमदनगर येथील एका सरपंचाने या समस्येवर उपाय करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केले तर मुलीला पाच हजार रुपये व संसाररुपी वस्तू हे सरपंच देणार आहेत.
आनंदा रावसाहेब दुरगुडे असं या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सरपंचांचे नाव आहे. ते संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावचे सरपंच आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न करणाऱ्या मुलीला ते स्वखर्चातून पाच हजार रुपये व संसाररुपी साहित्य ते देणार आहेत. या योजनेला त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना असे नाव दिले आहे. सध्या या सरपंचानी आपल्या गावात ही योजना कार्यान्वित केली आहे.
सरकारी योजनेला अर्ज कसा करायचा?
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या महा ई -सेवेत जाऊन चकरा मारण्याची गरज नाही. आत्ताच Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि घरबसल्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. हॅलो कृषीमध्ये या व्यक्तिरिक्त, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकटात मिळत आहेत. यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तरीही शेतकरी मुलाला मुली देताना लोक काटकसर करत असतात त्यामुळे आपण जर अशा शेतकऱ्यांसाठी काही हातभार लावू शकतो का? रोख रक्कम किंवा साहित्य देऊ शकतो का? हा विचार माझ्या मनात होता, त्यामुळे शेतकरी अर्धांगिनी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया सरपंच आनंदा रावसाहेब दुरगुडे यांनी दिली. या माध्यमातून शेतकरी मुलाच्या लग्नात ५००० रुपये रोख रक्कम आणि संसारासाठी लागणाऱ्या वस्तू आपण स्वखर्चातून देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. सध्या संपूर्ण राज्यात या योजेनची जोरदार चर्चा सुरु आहे.