हॅलो कृषी ऑनलाईन । आजच्या बदलत्या काळानुसार शेतीच्या रूपात आणि स्वरूपामध्येही बदल होताना दिसत आहेत. पारंपरिक शेती सोडून विदेशी फळांच्या लागवडीकडे अनेक शेतकरी वळत आहेत आणि भरगोस नफाही मिळवत आहेत. शेती डोक्याने केली तर त्यातही मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो हे सिद्ध करणारी एक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारमधील एका शेतकऱ्याने तैवानी टरबूज आणि खरबूजाची (Cultivating Watermelon And Melon) लागवड करून तब्बल 60 लाख रुपयांची कमाई केली आहे. मुन्ना सिंह असं या शेतकऱ्याचे नाव आहे.
बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील दरिडीह येथील मुन्ना सिंग तैवानच्या टरबूज आणि खरबूजाची लागवड करत आहेत. त्यांना जवळपास 20 एकर शेती आहे. आपल्या शेतात ते तैवानच्या टरबूज आणि खरबूज पिकवतात. तैवानच्या टरबूज आणि खरबूजाची मोठ्या प्रमाणावर शेती करणारे मुन्ना सिंग हे जिल्ह्यातील पहिले शेतकरी असून त्यांच्यासह इतर अनेक शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. आज, या फळाच्या माध्यमातून अवघ्या तीन ते चार महिन्यांत त्यांनी 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत पैसे कमवले आहेत.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही कोणत्या फळाची किंवा रोपांची लागवड करायची असेल आणि रोपे खरेदी करायची असतील तर चिंता करू नका. हॅलो कृषी हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या आसपास असलेल्या रोपवाटिका मालकांशी थेट आणि अगदी कमी वेळेत संपर्क साधा. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड आणि Install करा. Hello Krushi ओपन करताच तुम्हाला त्यामध्ये रोपवाटिका, खत दुकाने आणि कृषी केंद्र हा पर्याय दिसेल. यावर क्लीक करताच तुम्हाला तुमच्या आसपास असलेल्या खत दुकानदार आणि रोपवाटिकांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिसतील. याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सर्व मालाचे बाजारभाव, सातबारा उतारा, जमीन मोजणी अशा सुविधा मिळतात. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकता. त्यासाठी Download करा Hello Krushi.
मुन्ना सिंग म्हणतात की, तैवानी टरबूज आणि खरबूजची शेती करणे खूप फायदेशीर आहे. त्याची एक एकर लागवड करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यातून त्यांना तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळतो. बाजारात या फळांची किंमत 30 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत आहे. मुन्ना सिंग म्हणतात, जेव्हा पहिल्यांदा त्यांनी तैवानच्या टरबूज आणि खरबूज या फळांची शेती सुरु केली तेव्हा गावातील लोकांनी त्यांना मुर्खात काढले. मात्र त्यामध्ये मिळणार फायदा बघितल्यानंतर न वर्षानंतर सुमारे 5 शेतकऱ्यांनी 16 एकरच्या आसपास खरबूज पिकवण्याची तयारी सुरू केली आहे.