शेतकरी मित्रांनो जाणून घ्या मूग, उडीद यांचे सुधारित वाण आणि बीजप्रक्रिया याविषयी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम मध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद या दोन महत्त्वाच्या कडधान्य वर्गीय पिकांची लागवड केली जाते. मूग आणि उडीद या दोन्ही पिकांची मिळून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सुमारे सात व आठ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मूग आणि उडीद ही 70 ते 75 दिवसांत येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पद्धती मध्ये ही दोन्ही अतिशय महत्त्वाची आहेत.

मूग आणि उडीदाचे सुधारित वाण
मुगाचे अनेक वाण उपलब्ध आहेत यातून वैभव हा वाण खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. यामध्ये वैभव व बी. पी. एम. आर 145 हे दोन वाण रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. हे दोन्ही वाण भुरी रोगाला प्रतिकारक आहेत आणि कोपरगाव या पारंपरिक वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारे आहेत. कोपरगाव एक हा मुगाचा वाण जुना असून त्यावर भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्यामुळे हा वाण घेण्याचे टाळावे.

१) वैभव हा मुगाचा 2001 मध्ये आलेला वाण आहे. त्याचा कालावधी 70 ते 75 दिवस असून याद्वारे चौदा ते पंधरा किलो प्रति हेक्‍टरी ते उत्पादन मिळते. हे भान अधिक उत्पादनक्षम भुरी रोग प्रतिकारक्षम टपोरी हिरवे दाणे आणि महाराष्ट्राकरिता प्रसारित आहे.

२) पी के व्ही. एम के एम 4 – या वाणाचा कालावधी 65 ते 70 दिवसांचा असून उत्पादन प्रति हेक्‍टरी 12 ते 15 किलो इतका आहे. हे वाण अधिक उत्पादन मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता, बहु रोगप्रतिकारक आणि महाराष्ट्राकरिता प्रसारित आहे.

३)पि. व्ही. के ग्रीन गोल्ड – या वाणाचा कालावधी 70 ते 75 दिवसांचा असून दहा ते अकरा क्विंटल प्रति हेक्‍टर इतके उत्पादन मिळते. मध्यम आकाराचे दाणे एकाच वेळी पक्वता येणार आहे. हे बुरी रोग प्रतिकारक्षम तसेच विदर्भासाठी प्रसारित आहे.

३) बीएम 2003-2– या वाणाचा कालावधी दिवस 65 ते 70 असा आहे. 12 ते 14 किलो प्रति हेक्टर इतके उत्पादन या वानामुळे मिळते. याची वैशिष्ट्ये म्हणजे टपोरे दाणे, लांब शेंगा व भुरी रोग प्रतिकारक्षम अधिक उत्पादन आणि महाराष्ट्राकरिता हे वाण प्रसारित आहे.

४) बीएम 2002 -1 या वाणाचा कालावधी 65 ते 70 दिवसांचा असून या वानाद्वारे प्रति हेक्‍टरी 12 ते 14 किलो उत्पादन होते. या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे टपोरे दाणे लांब शेंगा व भुरी रोग प्रतिकारक्षम अधिक उत्पादन एकाच वेळी पक्व होणारा वाण आणि हे वाण महाराष्ट्राकरिता प्रसारित आहे.

उडीद सुधारित वाण

उडदा मध्ये काही मोजकेच वाण आहे त्यापैकी टी. पी.यु -४ , टी. ए . यु – १ हे वान उत्कृष्ट गणले जातात दोन्ही टपो-या काड्या दाण्यांचे वाण असून त्यांच्या पक्वतेचा कालावधी हा 70 ते 75 दिवसांचा आहे.

1) बि. डी. यु.1– या वाणाचा कालावधी 70 ते 75 दिवस असून या वाणाचे प्रति हेक्‍टरी 10 ते 12 किलो उत्पादन मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे टपोरे दाणे आणि हे वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित आहे.

2)टि. पि. यु -1 या वाणाचा कालावधी 65 ते 70 दिवसांचा असून प्रति हेक्‍टरी 10 ते 12 किलो उत्पादन मिळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे टपोरे दाणे, रोपावस्थेत जोमदार वाढ, एकाच वेळी पक्वता, भुरी रोग मध्यम प्रतिकारक विदर्भासाठी हे वाण प्रसारित आहे.

3) पी. के. व्ही उडीद 15 – या बाणाचा कालावधी 65 ते 70 दिवसांचा असून प्रति हेक्‍टरी 10 ते 12 किलो उत्पादन मिळते याचे वैशिष्ट्य म्हणजे टपोरे दाणे एकाच वेळी पक्वता भूरी रोगास मध्यम प्रतिकारक विदर्भासाठी हा वाण प्रसारित आहे.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी. त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणू ची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावे मूग उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मा मुळे सुरुवातीच्या काळात बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते रायझो्बियम मुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

Leave a Comment

error: Content is protected !!