Farmer Loan : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अनेकदा जास्त पैशाची गरज भासत असते. यावेळी शेतकरी कर्ज काढण्याचा विचार करतात. मात्र कर्जा संबंधित काही माहिती शेतकऱ्यांना माहीत नसते त्यामुळे कर्ज काढण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पीक कर्जाला खूप महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांना सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहारा देत असते. मात्र बऱ्याचदा याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही मग शेतकरी त्यांच्या जमिनीवर कर्ज काढण्याचा विचार करतात मात्र शेतकऱ्यांना जमिनीवर कर्ज काढताना देखील काही अडचणींचा सामना करावा लागतो यामध्ये जर तुम्हाला एक एकर क्षेत्रावर कर्ज काढायचे असेल तर कर्ज किती मिळू शकते हे माहीत असणे देखील खूप गरजेचे आहे. (Farmer Loan)
एक एकर जमिनीवर किती कर्ज मिळू शकते?
साधारणपणे जमिनीच्या क्षेत्रनिहाय विचार केला तर एक एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना जास्तीचे तीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की जर शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान 50 ते कमाल तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते.
शेतकऱ्यांना जे कर्ज मिळते त्या कर्जाचे स्वरूप हे त्यांचे उत्पन्न त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्रफळ व गेल्या वर्षीचे पीक यावर अवलंबून असते. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सात टक्के व्याज व्याज दराने कर्ज मिळते. त्याचबरोबर जर तुम्ही वेळेमध्ये कर्जाची परतफेड केली तर शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदरात तीन टक्के सवलत देखील सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे.
Hello krushi ॲप बद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेतकरी मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी Hello krushi हे ॲप बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व शेती विषयक माहिती घेऊ शकता. जसे की, आता आपण पाहिले कर्ज कसे मिळवायचे त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. या सर्वांची माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. अनेक शेतकरी या ॲपचा लाभ घेत आहेत तुम्ही देखील याचा लाभ घ्यावा.