Farmer Loan । शेतकऱ्यांना जर शेतीतून चांगला परतावा मिळाला नाही तर त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. इतकेच नाही तर त्यांना पूर, अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होते. अशावेळी त्यांना कर्ज मिळणे अशक्य होते. बँका पीक कर्ज देताना टाळाटाळ करतात. अशावेळी बऱ्याचदा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा विचार येतो. मात्र आता शेतकऱ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता सरकारने योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत त्यांना ३ लाख रुपयांचे कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड असे या योजनेचे नाव आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनता यावे आणि महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण व्हावी हा या योजना सुरु करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपवरून तुम्ही घरबसल्या अगदी सहज कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. अँप ओपन केल्यांनतर शासकीय योजना या विभागात गेल्यावर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये सर्व माहिती देण्यात आली असून शेवटी Apply Now असे बटन आहे. हॅलो कृषी अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत असून यावर जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, बाजारभाव पाहणे अशा अनेक सेवा मोफत दिल्या जातात. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करा.
जाणून घ्या फायदे
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सात टक्के व्याजदराने कर्ज मिळते. वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजदरात तीन टक्क्यांची सवलत देते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते चालू करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ३ लाखांचे कर्ज मिळेल. यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक हातभार लागू शकतो.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असावे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला खते, बी बियाणे, कृषी यंत्र,शेती, मत्स्यपालन, पशुपालन इत्यादीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अर्ज करण्यासाठी तुमहाला पीएम किसान पोर्टलवर जावे लागेल. फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती भरून तो बँकेत जमा करून खाते चालू करू शकता.