Success Story : अननसाची शेती करून महाराष्ट्रातील शेतकऱ्याने कमवले 1.5 कोटी रुपये? जमीन कशी लागते अन लागवडीची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farmer Success Story : सध्या सगळीकडे बरेच शेतकरी फळबाग शेती करताना दिसत आहेत. फळबाग शेती मधून चांगले उत्पन्न मिळते आणि पैसा देखील चांगला राहतो यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा फळबाग लागवडीकडे वळला आहे. आपण अनेक असे शेतकरी पाहिले असतील ज्यांनी फळबाग लागवडीतून चांगला पैसा देखील कमवला आहे. आज देखील आपण अशाच एका शेतकऱ्याची माहिती पाहणार आहोत. ज्याने अननस लागवडीतून चांगला नफा कमावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील सुरेश दळवी या शेतकऱ्याने 15 वर्षांच्या परिश्रमातून 152 एकरवर अननसाची (Pineapple Farmer) किफायतशीर शेती उभी केली आहे.

1 कोटी 52 लाख रुपयांची कमाई

या शेतकऱ्याची शेती तिलारी धरणा जवळ आहे. त्यामुळे या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे अननसाच्या शेतीला मुबलक पाणी मिळाल्याने पडीक जमिनीवर अननसाची शेती करून वर्षाकाठी 152 एकर क्षेत्रामधून एक कोटी 52 लाख रुपयांचा वार्षिक नफा शेतकऱ्याने मिळवला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होत असून हा शेतकरी तर शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनला आहे. सुरेश दळवी असा या शेतकऱ्याचे नाव आहे

या शेतकऱ्याने शेतकऱ्याने भाडे तत्वावर जमिनी घेऊन अननस, रबरची शेती करायला सुरुवात केली. त्यांनी अननसाची शेती करण्यासाठी केरळ राज्यात जाऊन अननसाच्या शेतीची प्रत्यक्षात पाहणी केली. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी सर्व बारीक गोष्टींची चौकशी केली त्यानंतर ही शेती फायदेशीर आहे की तोट्याची ही देखील पाहिलं. त्यानंतर त्यांनी गावाकडे येत सुरुवातीला भागीदारीमध्ये 25 ते 30 एकर वर अननसाची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शेती करायला सुरुवात केली.

अननसाची विक्री कशी केली जाते?

अननसाचे रोप एकदा लावल्यानंतर सलग चार वर्षे उत्पन्न देतात. त्यामुळे एकदा का तुम्ही अननसाची लागवड केली तर तुम्हाला चार वर्षे त्याची निगा राखायची असते. सुरवातीला अननसाला दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये मोठी मागणी होती. मात्र बेळगाव, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील व्यापारी जागेवर येऊन अननस घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्याला चांगला नफा देखील राहतो.

अननसाला कीती बाजारभाव मिळतो?

अननसाला सरासरी यावर्षी 60 रुपये किलो दर मिळाला. एका एकरात अननसाच्या लागवडीतून सरासरी दोन लाखांचं उत्पन्न होत. शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील अननस लागवडीचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याआधी याबाबतची सर्व माहिती घेणे आवश्यक असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्हालाही माहिती कुठे मिळेल? तर यासाठी तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. इतर कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही तुम्ही घर बसल्या याबाबतची माहिती घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त Hello Krushi नावाच ॲप गुगल प्ले स्टोअर वरून तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावा लागेल. हे केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अननस लागवड कशी करावी, त्याच व्यवस्थापन कसे करावे? त्याला बाजार भाव किती मिळतो? या सर्व प्रकारची माहिती मिळेल. त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टॉल करा.

error: Content is protected !!