Farmer Success Story : वांग्याला मिळतोय चांगला भाव, काही दिवसातच शेतकरी बनला लखपती; जाणून घ्या कसे वाढवले उत्पन्न?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farmer Success Story अनेक शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श बनत आहेत. सध्या बरेच शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत करताना दिसत आहेत. तरकारीमधून देखील अनेक शेतकरी चांगला बक्कळ नफा कमवत आहेत. सध्या देखील एक शेतकरी चर्चेचा विषय ठरत आहे. मागच्या काही दिवसापासून वांग्याचे भाव तेजीत आहेत त्यामुळे शेतकऱ्याने वांग्याच्या शेतीतून चांगला नफा कमवला आहे. .

नांदेडचा शेतकरी झाला लखपती

महाराष्ट्र मधील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील जांभळा या ठिकाणच्या शेतकऱ्याने वांग्याची लागवड केली असून त्यामधून चांगले उत्पन्न घेतले आहे. यामुळे या शेतकऱ्याची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. निरंजन सरकुंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरंजन सरकुंडे यांनी केवळ दीड बिघे जमिनीत वांग्याची लागवड केली असून त्यामधून त्यांना जवळपास 2 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्याच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

याबाबत बोलताना निरंजन यांनी सांगितले की त्यांच्याकडे पाच एकर जमीन असून त्यांनी दीड गुंठा शेतीत वांग्याची लागवड केली. सुरुवातीला वांग्याला भाव मिळेल की नाही, परवडेल की नाही असा मोठा प्रश्न पडला होता. मात्र त्यानंतर त्यांचे नशीबच बदलले दररोज वांगी विकून त्यांची चांगली कमाई होऊ लागली. वांग्याला देखील चांगला भाव मिळत असल्याने या शेतकऱ्याने अगदी कमी कालावधीतच चांगला नफा मिळवला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला पाहून शेजारच्या गावातील शेतकऱ्यांनी देखील भाजीपाला लागवड सुरू केली. आता सर्व शेतकरी भाजीपाला पिकवून चांगले उत्पन्न घेत आहेत.

सिंचनाचा केला वापर

नांदेड भागाचा विचार केला तर त्या भागामध्ये पाणीटंचाईचा हा प्रश्न कायमच असतो. यामध्येच सरकुंडे यांच्या गावांमध्ये पाणीटंचाईचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी यावर मात करत ठिबक सिंचन पद्धतीने पिकांना पाणी देत वांग्याची लागवड केली आणि यामधून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

हे शेतकरी उमरखेड आणि भोकर जवळच्या बाजारपेठांमध्ये वांगी विकतात त्यांनी फक्त दीड बिघे जमिनीत वांग्याची लागवड केली असून त्यांना आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर दीड बिघे वांगी पिकवण्यासाठी त्यांना 30 हजार रुपये खर्च झाले. त्यामुळे आता वांगी क्षेत्रात अजून वाढ करण्याची देखील इच्छा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

लागवडीचा हंगाम

वांग्‍याची लागवड तिनही हंगामात करता येते.खरीप बियांची पेरणी जूनच्‍या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्‍टमध्‍ये केली जाते. रब्‍बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्‍टेबर अखेर करतात आणि रोपे आक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये लावतात.उन्‍हाळी हंगाम–बी जानेवारीच्‍या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारीत करतात.

वाण

मांजरी गोटा : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्‍यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्‍यमहिन्‍यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 400 क्विंटल.

वैशाली : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्‍यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्‍यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्‍यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन 300 क्विंटल.

प्रगती : या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्‍या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्‍यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्‍या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्‍या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल.

अरूणा : या जातीची झाडे मध्‍यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्‍यात लागतात. फळे मध्‍यम आकाराची आणि अंडाकृती असून त्‍यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल वांग्‍याच्‍या वरील जाती शिवाय कृष्‍णा एम एच बी 10 या अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत जाती आहेत.

error: Content is protected !!