Farmer Suicides : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनातून प्रबोधन व्हावे – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer Suicides) बनविलेल्या टास्क फोर्सचे लवकरच पुनर्गठन केले जाणार आहे. विविध संत-महात्मे राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी सरकार सर्वतोपरी (Farmer Suicides) मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटने नार्हेण फाटा, तळोजा एमआयडीसी रोड येथे आयोजित मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार डॉ. बालाजी किणीकर उपस्थित होते. अखंड हरिनामाने भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावणारी ही अध्यात्मिक ताकद आहे. आमच्या सारख्या राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संत महात्मांच्या प्रेरणेने देश आणि समाज कार्यासाठी काम करण्याची उमेद निर्माण होते. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हरिनाम सप्ताह ही काळाची गरज (Farmer Suicides In Maharashtra)

महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. संतांचा सन्मान करणे, ही आपली संस्कृती आहे. मलंगड आणि या भूमीतील पुरातन शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मराठी संस्कृतीचे वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवितो. कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतो. कीर्तनकाराचे महत्त्व आपल्या महाराष्ट्रात खूप आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रत्येक हरिनामाला उपस्थित राहायचे. धकाधकीच्या आयुष्यातूनही ते हरिनामासाठी वेळ काढायचे आणि आम्हालाही सांगायचे. सन्मार्गावर कायम चालत राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!