घसरलेल्या दराने टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला; 40 पैसे किलो भाव मिळाल्याने स्त्यावर फेकला माल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजरसमित्यांमध्ये टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. काही बाजरसमित्यांमध्ये तर टोमॅटोला किमान भाव प्रति क्विंटल केवळ २०० रुपये मिळतो आहे. तर कमाल दर देखील हजार रुपयांच्या आतच आहेत. टोमॅटोची ही तऱ्हा असताना औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो बाजारात विकण्याऐवजी अक्षरश: रस्त्यावर फेकून दिले आहेत. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील वडजी गावातील कैलास बोंबले या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. दरम्यान आज टोमॅटोचा पहिला लॉट निघाल्याने त्यांनी पैठणच्या बाजारात टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी 20 ते 22 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला 30 ते 50 रुपयांचा भाव मिळत असल्याचं कळताच त्यांनी अर्ध्या रस्त्यातच टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. म्हणजेच प्रति किलो 40 पैसे असा दर मिळत आहे त्यामुळे गाडी भाडं देखील त्यांना खिशातून भरावे लागले. काहीच हाती येत नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्क कष्टाने पिकवलेला माल रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

यावर्षी सुरवातीलाच अतिवृष्टी झाल्याने पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यातच जी उरलीसुरली पीक आहेत त्यांचं परतीच्या पावसात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास हातून गेलं आहे. अशात शेतकऱ्यांनी कसेबसे वाचवलेल्या पालेभाज्यातून याची भरपाई भरून निघेल अशी अपेक्षा असतानाच अचानक दर कोसळत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तर याचा अधिक फटका बसला आहे.

error: Content is protected !!