Farmers Interest Waive : राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना संपूर्ण व्याजमाफी; आलाय सरकारचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Farmers Interest Waive) असून, 2015-16 यावर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार 2015-16 या वर्षातील संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे सहा टक्के दराने असलेले सर्व व्याज राज्य सरकारकडून भरले जाणार आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारकडून (Farmers Interest Waive) जारी करण्यात आला आहे.

2015 यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या कालावधीत राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला याची मोठी झळ बसली होती. त्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी (Farmers Interest Waive) देण्याची मागील सप्टेंबर 2023 मध्ये राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार 2014-15 या वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे 2015-16 या वर्षातील संपूर्ण व्याज माफ राज्य सरकारकडून केले जाणार आहे. याशिवाय पुढील चार वर्षांचे 6 टक्के दराने व्याज देखील राज्य सरकारकडून भरले जाणार आहे. याबाबतच्या निर्णयाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 11 हजार 783 शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कोणाला लाभ मिळणार नाही (Farmers Interest Waive In The State)

ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा’ लाभ घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे राज्य सरकारच्या जीआरमध्ये सरकारकडून स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, व्याजमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी रत्नागिरी जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवावे, असे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी वाचा सरकारचा जीआर – (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401121449418602.pdf)

error: Content is protected !!