हॅलो कृषी ऑनलाईन : अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा (Farmers Loan) घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केले आहे. ही घटना मागील आठवड्यात 17 मे रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना अकोला तालुक्यातील मनब्दा गावातील (Farmers Loan) असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल (Farmers Loan)
या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न (Farmers Loan) निर्माण होत असून, पोलीस यंत्रणेचा धाक उरला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा एक व्हिडिओ सध्या ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ होत आहे. हा व्हिडिओ सावकाराने तरूणाला केलेल्या मारहाणीचा आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावात हा प्रकार घडला आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हल्ला
सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरून वाद आहे. हा वाद सध्या न्यायालयात आहे. परंतु शेळके यांनी दमदाटी करत शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सावकारासह तिघांवर गुन्हा दाखल
या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ल्या करण्यात आला आहे. यामध्ये महिला देखील हल्ल्याला विरोध करत असल्याहे दिसत आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये परस्पर तक्रारीवरून तसेच सावकारासह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.