Farmers March : शेतकरी देणार दिल्लीला धडक; प्रजासत्ताक दिनी कँडल मार्च!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटना (Farmers March) आक्रमक झाल्या असून, या संघटनांकडून 13 फेब्रुवारीला ‘चलो दिल्ली’चा नारा देण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चासह 18 शेतकरी संघटनांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे हे आंदोलन (Farmers March) केले जाणार असल्याचे संघटनांकडून सांगितले जात आहे.

आंदोलनाची रूपरेषा? (Farmers March Will Strike In Delhi)

शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार, 10 जानेवारीला पुन्हा चंदीगडमध्ये शेतकरी नेत्यांच्या, विचारवंतांच्या गटाची एक बैठक होणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 3 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ 26 जानेवारी रोजी देशभरात कँडल मार्च काढण्यात येणार आहे. तर 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय राजधानीकडे ‘चलो दिल्लीचा’ नारा देत देशभरातील शेतकरी संघटनांकडून शेतकरी मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे.

काय आहे मागण्या?

  • शेतमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देणारा कायदा करावा.
  • स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी.
  • 2006 मध्ये एम.एस. स्वामीनाथन यांनी कृषी खर्च आणि किंमत आयोगाला उत्पादनाच्या आधारावर सरासरी खर्चापेक्षा किमान 50 टक्के अधिक एमएसपी निश्चित करण्याची सूचना केली होती.
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.
  • विजेचे खासगीकरण थांबवावे.
  • 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी.

प्रजासत्ताक दिनी कँडल मार्च

शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने नवीन तीन कृषी कायदे करण्याची योजना बनवली होती. त्या कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांकडून देशभरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात काही शेतकरी शहीद झाले होते. या मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ 26 जानेवारी रोजी देशभरात कँडल मार्च काढण्यात येणार आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनांच्या वतीने 26 जानेवारीला देशभरात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.

error: Content is protected !!