शेतकऱ्यांनो ,काही मिनिटात मोबाईलद्वारे करा स्वतःच जमिनीची मोजणी ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या शेताची किंवा जमिनीची मोजमाप कमी श्रमात करायची असेल, तर आता तुम्हाला कोणत्याही टेपची किंवा पट्ट्याची गरज भासणार नाही, कारण आज आम्ही तुम्हाला असा फंडा सांगणार आहोत ज्यामुळे काही मिनिटांत शेत किंवा जमीन मोजता येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे फक्त एक स्मार्टफोन असावा, ज्यामध्ये इंटरनेट आणि जीपीएसची सुविधा असेल.

शेत किंवा जमिनीचे मोजमाप करण्यासाठी अर्ज करावा लागतो मात्र आता त्यानंतर हे सर्व काम या अॅप्लिकेशनद्वारेच केले जाईल. हे अॅप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनमध्ये आणण्यासाठी शेतकरी बांधवांना आधी गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.यानंतर, तुमच्या फोनमध्ये “distance and area measurement” नावाचे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या फोनचा GPS ऑन करून हे अॅप्लिकेशन ओपन करावे लागेल.

मोबाईलने शेताचे मोजमाप कसे करायचे?

फोनमध्ये “distance and area measurement”नावाचे ऍप्लिकेशन उघडल्यानंतर, “Distance” , मीटर, फूट, यार्ड इत्यादीसाठी मोजमापांपैकी एक निवडा.जर शेतकरी बांधव शेतजमिनीचे मोजमाप करत असतील तर ते Area साठी Acre निवडू शकतात. आता तुम्हाला तळाशी एक स्टार्ट बटण दिसेल, जे दाबून तुम्हाला मोजण्यासाठी जमिनीभोवती पूर्ण फेरी काढावी लागेल.

इथे शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की तुम्हाला जमिनीच्या कानाकोपऱ्यातून क्षेत्रफळ मोजायचे आहे. तुमची एक फेरी पूर्ण होताच, त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या जमिनीचा पूर्ण आकार कळेल.

या ऍप्लिकेशनद्वारे शेतकरी बांधव जमिनीच्या आकारमानाचा अंदाज बांधू शकतात. तेव्हा शेतकरी बांधवांनो, आता जेव्हाही तुम्ही तुमच्या शेतात किंवा जमिनीवर जाल तेव्हा हे ऍप्लिकेशन एकदा नक्की वापरून पहा.

.

Leave a Comment

error: Content is protected !!