Farmers Protest At Mantralaya : सध्या मंत्रालयामधून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर असलेल्या जाळीवर शेतकऱ्यांनी उड्या मारल्या आहेत. शेतकऱ्यांनी उड्या मारत अनोखे आंदोलन केले आहे. माहितीनुसार हे शेतकरी अमरावती जिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. कुणी उडी मारून आत्महत्या करू नये यासाठी ही जाळी लावण्यात आली आहे मात्र या शेतकऱ्यांनी या जाळीवर उड्या मारल्याने सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आज या शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयामध्ये आंदोलन केले आहे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकार विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी मंत्रालयाच्या मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Farmers Protest At Mantralaya )
पोलिसांनी घेतले ताब्यात
माहितीनुसार. सध्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी जवळपास १२ ते १५ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र उद्यापर्यंत जर सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर आत्महत्या करणार असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शेतकरी मागच्या काही दिवसापासून मोर्शीच्या तहसीलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते मात्र न्याय मिळाल्याने शेतकऱ्यांचे मंत्रालयात आक्रमक आंदोलन केल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं शेतकऱ्यांनी आंदोलन का केलं?
अप्पर वर्धा कृती समितीच्या वेगवेगळ्या मागण्या आहे. त यामधून शासनाकडून हक्काच्या मोबदल्यांची चांगली रक्कम मिळाव. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तास सरकारी नोकरी मिळावी अशा वेगवेगळ्या मुद्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. आज आंदोलकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार होते. मात्र त्यांना मंत्र्यांची वेळ न मिळाल्याने त्यांनी उड्या मारल्याचे सांगण्यात येत आहे