Farmers Protest : 10 मार्चला शेतकरी रेल्वे वाहतूक रोखणार; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलनाची (Farmers Protest) हाक दिलीये. मात्र, गेले आठवडाभर थंडावलेले शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे. 6 मार्चपासून पुन्हा एकदा शंभू आणि खनौरी बॉर्डरवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करणार आहे. याशिवाय 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 यादरम्यान, शेतकरी संघटनांकडून रेल्वे वाहतूक अडवण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी संघटनांकडून जाहीर करण्यात आली आहे. पंजाबमधील भटिंडा येथील तरुण शेतकरी शुभकरण सिंह याच्या अंत्यविधी व दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानंतर शेतकरी संघटनांनी बैठक घेत शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) ही माहिती जारी केली आहे.

शेतकरी आंदोलन सुरूच राहणार (Farmers Protest Block Railway Traffic)

विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. किंवा मग लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी देखील सध्या सुरु असलेले शेतकरी आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे शेतकरी संघटनांनी या बैठकीत म्हटले आहे. भारतीय किसान सभेचे नेते सरवन सिंह पंढेर आणि जगजीत सिंह डल्लेवाल यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोची होणार आहे.

डल्लेवाल यांची माध्यमांना माहिती

शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, शेतकरी संघटनांकडून 10 मार्च रोजी देशभरात दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान रेल्वे वाहतूक रोखून धरली जाणार आहे. संघटनांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून, शेतकरी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव मिळावा. या मागणीसाठी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे 6 मार्चपासून पुन्हा शंभू आणि खनौरी बॉर्डरवर मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत आंदोलन करताना दिसून येणार आहे.

error: Content is protected !!