Farmers Protest : फ्रांसमधील शेतकरी खवळला; भर रस्त्यात खतांचे, गवताचे, शेणाचे ढिगारे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी राज्यासह देशातील शेतकरी अनेकदा आंदोलने (Farmers Protest) करतात. शेतकरी कधी शांतीपूर्ण मार्गाने मोर्चे काढत तर कधी आक्रमक होऊन घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करताना दिसून येतात. मात्र परदेशातही शेतकरी आंदोलने करतात का? परदेशातील शेतकरी आंदोलन करताना कोणत्या पद्धतींचा वापर करतात? असा विचार तुमच्याही मनात अनेकदा आला (Farmers Protest) असेल. मात्र आज तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे.

सध्या फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. फ्रांसमधील शेतकरी तेथील सरकारविरोधात अनोख्या स्टाईलने आंदोलन करताना दिसून येत असून, या हटके आंदोलनाची सोशल माध्यमांवर सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. फ्रांसमधील शेतकरी आंदोलनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल माध्यमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फ्रांसमधील शेतकऱ्यांनी भररस्तात खतांचे, शेणाचे, गवताचे व शेतमालाचे ढिगारे टाकले आहे. तर काही शेतकऱ्यांनी सरकारी कार्यालयांबाहेर शेणाचा मोठा ढिगारा घातला आहे. त्यामुळे आता फ्रांसमधील अनोख्या स्टाईलने होत असलेल्या या आंदोलनाची संपूर्ण जगभर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे फ्रान्समधील शेतकरी इतके चिडले आहेत की, या आंदोलनामुळे तेथील राजकीय नेत्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

आंदोलनामागील कारण? (Farmers Protest In France)

आता तुम्ही विचारात पडला असाल इतक्या प्रगत देशामध्ये शेतकऱ्यांना आंदोलनाची गरज पडलीच का? तर फ्रेंच सरकारने देशातील कृषी कायद्यांमध्ये काही बदल केले आहेत. या कायद्यांमधील नवीन बदल हे तेथील शेतकऱ्यांना मान्य नाही. बदलेल्या नियमांमुळे आपले आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा फ्रान्समधील शेतकऱ्यांनी केला असून, त्यांनी हटके पद्धतीने आक्रमणपणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

फ्रांसमधील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून, काही भारतीय नेटकऱ्यांकडून या आंदोलनाची तुलना भारतीय शेतकरी आंदोलनाशी केली जात आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी भर भररस्तात खतांचे, शेणाचे, गवताचे व शेतमालाचे ढिगारे घातल्याने, वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या उदभवल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!