शेतकऱ्यांनो, विद्राव्य खते वापरताना ‘या’ गोष्टी माहिती असल्याच पाहजेत; जाणून घ्या ‘फर्टिगेशन’ म्हणजे काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, पिकांच्या जोमदार वाढीसाठी खतांचा वापर शेतकऱ्यांकडून हमखास केला जातो. मात्र पिकांना खते देण्यापूर्वी माती परीक्षण, पिकाच्या वाढीनुसार खतांची गरज, हवामान या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण पिकांसाठी विद्राव्य खतांचा वापर कसा करायचा? याची माहिती घेऊया…

पाण्यात विरघळणारी खते

याशिवाय सध्या बाजारात नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म मूलद्रव्य यांचे घटक असलेली पाण्यात विरघळणारी खते उपलब्ध आहेत. गरजेनुसार व मात्रा ठरवून ही खते ठिबक संचातून देणे योग्य आहे. ही खते दररोज आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांनी देणे सोयीचे असते.

‘फर्टिगेशन’ म्हणजे काय ?

शेतकरी मित्रांनो पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतांमधून पिकाच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला ‘फर्टिगेशन’ म्हणतात. यात खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. यामुळे खताची कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार विद्राव्य खतांचा वापर करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

नत्रयुक्त खते कशी वापरावीत?

अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम नायट्रेट आणि युरिया ही पाण्यात विरघळणारी नत्रयुक्त खते बाजारात उपलब्ध असतात. पिके नायट्रोजन नायट्रेट रूपात घेतात. अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड यातील नत्र थोड्या वेळातच नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते. परंतु या खतामुळे जमिनीतील आंमलता वाढते. त्यामुळे जमिनीचा सामू कमी होतो. परिणामी कालांतराने जमीनी नापीक बनतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुना वापरावा लागतो. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात वापरावीत. कॅल्शियम नायट्रेट व सोडियम नायट्रेट यांच्या वापरामुळे जमिनीतील क्षार वाढून जमिनी खारवट होतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. त्यामुळे ही खते पाण्यात विरघळून सुद्धा ठिबक संच्यात वापरता येत नाहीत. युरिया हे सर्व नत्रयुक्त खतांमध्ये सर्वात उत्कृष्ट पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे. त्यामुळे ते अधिक प्रमाणात वापरले जाते.

स्फुरदयुक्त खतांचा वापर

यामध्ये सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी, बोन मिल व रॉक फॉस्फेट हे प्रकार आहेत. यातील बोन मिल व रॉक फॉस्फेट हे अविद्राव्य आहेत. सुपर फॉस्फेट हे सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट या तीन प्रकारात मिळते. सुपर फॉस्फेट पाण्यात विरघळते परंतु त्याची विरघळण्याची क्रिया फार हळू आहे. त्यामुळे ठिबक सिंचनातून हे खत देणे त्रासाचे आहे. त्यामुळे स्फुरदाची मात्रा फॉस्फोरिक ऍसिड मधून देतात. ठिबक संचातून युरिया व सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण देणे अपायकारक आहे. कारण असे मिश्रण एकत्र दिल्यास सुपर फॉस्फेट चे रूपांतर फॉस्फोरिक ऍसिड मध्ये होते व ते वायुरूपी असल्यामुळे संचाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

पालाशुक्त खते

ही खते म्युरेट ऑफ पोटॅश व अमोनियम सल्फेट या स्वरूपात मिळतात. पोटॅश पाण्यात सावकाश विरघळते व आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनातून देता येते.

संदर्भ : ऍग्रोवन

Leave a Comment

error: Content is protected !!