Farmers Success Story: ‘एक लक्ष आम वृक्ष’ या शाश्वत शेतीद्वारे मराठवाड्यातील आंब्याचा वारसा पुन्हा जिवंत करणारा शेतकरी!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा सर्वांना आवडतो, (Farmers Success Story) परंतु या आंब्याचा वारसा जपणारे फार कमी शेतकरी असतात. आज आपण लातूरमधील अशा शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत जे आंब्याच्या संवर्धनासाठी (Conservation Of Mango Tree) मेहनत करत आहेत.

लातूरमधील महादेव गोमारे असे या शेतकर्‍याचे नाव आहे (Farmers Success Story).

आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेतकरी(Art Of Living Farmer), बियाणे संवर्धन आणि नैसर्गिक शेती प्रशिक्षक महादेव गोमारे म्हणतात, “एक काळ असा होता, जेव्हा लोक एका गावातून दुसर्‍या गावात आंब्याच्या झाडांच्या सावलीतून जात असत,” पण आज शहरीकरणामुळे शेतजमि‍नीच्या सीमेवर सुद्धा आंब्याची झाडे दिसत नाहीत.”

गोमारे हे नैसर्गिक पद्धतीने आंब्याची शेती (Natural Mango Farming) करतात. त्यांच्या शेतात आंब्याची अनेक झाडे आहेत. या आंब्याला फार कमी देखभाल करावी लागते तरीही त्यातून गोमारे यांना चांगला नफा मिळतो आणि विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाला नैसर्गिक आंबे (Natural Mango) खायला मिळतात याचे त्यांना समाधान वाटते.  

गोमारे सांगतात, “मला आंबा या फळाची लागवड वाढवून अधिकाधिक शेतकर्‍यांना यातून  फायदा व्हावा अशी माझी इच्छा होती. मला मा‍झ्या मुलांसाठी या झाडांचे आशीर्वाद आणि खेळण्यासाठी पुन्हा सावली हवी होती”.

या विचारातून 2023 साली ‘एक लक्ष आम वृक्ष’ या संकल्पनेचा जन्म झाला (Farmers Success Story).  या अंतर्गत 1 लाख आंब्याची झाडे लावण्याचा निश्चय करण्यात आला. जेणेकरून शेतकर्‍यांना अधिक आंब्याची झाडे वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

3 वर्षात 1 लाखाहून अधिक झाडे लावण्यासाठी, महादेवने 2023 मध्ये यशस्वीरित्या आंब्याचे बियाणे गोळा करायला सुरुवात केली (Farmers Success Story).

गोमारे लातूरमधील शेतकरी आणि रहिवाशांना आंब्याच्या बिया गोळा करून आमच्याकडे देण्याचे आवाहन करू लागले. रहिवासी सोसायट्या, महानगरपालिका, स्थानिक दुकाने आणि फळ विक्रेते- प्रत्येकाने या प्रकल्पासाठी आंब्याच्या बिया गोळा करण्यासाठी योगदान दिले आहे आणि स्वेच्छेने काम केले आहे. लवकरच, आम्ही विकसित केलेल्या संकलन केंद्रांवर लोकांनी आंब्याच्या बियांच्या पिशव्या टाकण्यास सुरुवात केली. या बियाण्यांवर मा‍झ्या शेतातील रोपवाटिकेत बायो एन्झाईम्सने बीजप्रक्रिया केली गेली, आणि त्यांनी आंब्याची रोपे बनवायला सुरुवात केली (Farmers Success Story).

“सामाजिक वनीकरणासाठी, शेतकर्‍यांना केसर वाण (Kesar Mango) आणि सोसायट्यांना इतर वाण देण्यासाठी आम्ही त्यांनी आंब्याची कलमे तयार केली. यामुळे लोकांच्या परिसरातील वनस्पती आणि जीवजंतूंना चालना मिळेल; कलमी आंब्याच्या झाडांमुळे जैवविविधता वाढेल आणि शेतकर्‍यांना अधिक उत्पन्न मिळेल” असे ते म्हणतात.

सध्या त्यांच्याकडे आंब्याची रोपे लावण्यास तयार आहेत आणि यावर्षी जुलैमध्ये शेतकरी आणि सोसायटींना वितरित केले जातील असे गोमारे सांगतात.

आंब्याची शेती म्हणजे शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना (Farmers Success Story)

गोमारे सांगतात की आंब्याच्या शेतीने जमिनीची धूप थांबते आणि पाण्याचे संरक्षण होते कारण त्यांना कमी पाण्याची आवश्यकता असते, परंतु हवामानातील बदल हे एक खरे आव्हान बनले आहे, त्यामुळे पूर आणि हवामानाच्या टोकाचा सामना करण्यासाठी फळझाडे वाढवणे आवश्यक आहे.

आंबे लागवडीकडे शेतकरी एक पेन्शन योजना म्हणून पाहू शकतात, आंब्याच्या लागवडीतून वर्षाला 4-5 लाख रू. पेक्षा जास्त उत्पन्न मिळते. असेही ते म्हणतात

नैसर्गिक आंब्याची शेती

मोठ्या प्रमाणावर मागणी असताना सुद्धा आंब्याबद्दल ग्राहकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. कारण सध्या रसायनांचा वापर करून आंबा पिकवला जात आहे.  

त्यांच्या नैसर्गिक आंबा शेतीमुळे लोकांना रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याऐवजी पौष्टिक, नैसर्गिक रित्या पिकवलेले आणि आरोग्यदायी आंब्याची फळे मिळणार आहेत” असे महादेव गोमारे सांगतात.

मराठवाड्यात आंब्याची लागवड का करावी? (Mango In Marathwada)

“आज शेतकरी आंब्याची फारशी लागवड करत नाहीत कारण त्यासाठी जागा लागते. शेतकरी झाड लावेल जर त्याला त्यातून परतावा मिळेल. या प्रकरणात, आंब्याचे झाड सर्वात योग्य पर्याय आहे, कारण ते मराठवाड्याच्या मातीच्या प्रकारासाठी देखील योग्य आहे”. मराठवाडा परिसरात 10 लाख झाडे लावण्याचे गोमारे यांचे व्हिजन आहे

“मराठवाड्यात पाण्याची भीषण समस्या आहे आणि शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीमुळे महिन्याला फक्त 20-30 हजार रुपये कमावतात. जर त्यांनी आंब्याची झाडे वाढवून 2 लाख रुपये कमावण्यास सुरुवात केली तर त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल, (Farmers Success Story) तसेच मराठवाड्यातील माती आता आंब्यासाठी अधिक योग्य आहे आणि त्यात उत्तम दर्जाचे आंबे पिकवता येतात.

गोमारे म्हणतात, “आमचे काम फक्त पहिली काही पावले उचलणे आणि शेतकर्‍याचा आत्मविश्वास वाढवणे आहे. पुढचे कार्य शेतकर्‍यांना स्वत: करायचे आहे.