Farmers Success Story: अस्मानी संकटाने पिकांचे नुकसान केले, तरीही शेतकरी भावांनी जिद्दीने यश गाठले!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेती आणि अस्मानी संकट यांचा नेहमीचाच संबंध आहे (Farmers Success Story). यात सर्वात जास्त मनस्ताप सहन करावा लागतो तो शेतकर्‍यांना (Farmers). परंतु बळीराजा या संकटात सुद्धा जिद्द आणि धैर्याने उभा राहतो आणि त्याची शेती राखतो. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आहे कोल्हापूरातील (Kolhapur) हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे राहणाऱ्या आदिनाथ खड्ड आणि कुंतीनाथ खड्ड या दोन भावांची (Two Brothers). या दोघांनी निसर्गाशी सामना करत काकडीच्या शेतीतून (Cucumber Farming) लाखो रूपयांचे उत्पन्न घेतले आहे (Farmers Success Story).

कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन शेतकरी भावंडांना कधी महापूरामुळे उसाचे पीक (Sugarcane Crop) गमवावे लागले तर कधी कडक उन्हामुळे त्यांचे टोमॅटोचे पीकही (Tomato Crop) वाळून गेलं. एवढी मोठी आव्हानं स्वीकारून सुद्धा ते निराश झाले नाही. रात्र दिवस मेहनत करून आज दोन्ही भावंडं लाखो रूपयांचे उत्पन्न (Farmers Success Story) घेत आहेत.

संकटांचा मारा

आदिनाथ व कुंतीनाथ दोघांनीही दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर दोन्ही भावांनी शेतीमध्ये आवड असल्यामुळे शेती व्यवसायात (Agriculture) लक्ष देण्याचा निर्णय घेतला. शेतीला जोड काहीतरी जोडधंदा असावा म्हणून दोघे भाऊ प्रिंटिगचे काम करतात. मात्र, शेतीकडे दोघांचे सर्वाधिक लक्ष असते. आदिनाथ आणि कुंतीनाथ हे दोघे भाऊ त्यांच्याकडे असलेल्या एकूण 56 गुंठे शेतीमध्ये पूर्वी पारंपारिक पीक म्हणून ओळख असलेल्या उसाची शेती करायचे (Farmers Success Story). मात्र, कोल्हापूर जिल्ह्याला 2019 आणि 2021 ला महापूराचा फटका बसला या महापूरात अनेक शेतकर्‍यांचे हाता तोंडाशी आलेले पीक महापूराने वाहून गेले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीत हे दोन्ही भावंड देखील होते. महापूरात त्यांच्या शेतात कित्येक दिवस पाणी थांबल्याने दोन्ही भावंडांचे मोठे नुकसान झालं.

मात्र निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही असे म्हणत हे नुकसान भरून काढण्यासाठी दोन्ही भावंडांनी पारंपरिक ऊस शेती सोडून नवीन पालेभाज्यांची शेती (Vegetable Farming) करायचा निर्णय घेतला. पाले भाज्यांच्या शेती संदर्भात त्यांना कोणतीही माहिती नसल्याने आपल्याच गावातील अनुभवी पालेभाज्यांची शेती करणाऱ्या शेतकर्‍यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले. आणि टोमॅटो पिकाचं उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन्ही भावंडांनी 56 गुंठ्यात टोमॅटो पिकाची लागवड केली. यासोबतच कोबी आणि काकडी या आंतर पिकाची (Cucumber As Intercropping) देखील त्यांनी लागवड केली. मात्र कधी नव्हे ते कोल्हापूरात वाढलेले तापमान जिथे माणसाच्या अंगाची लाहलाही होत होती. अशा परिस्थितीत पीक देखील जीव सोडू लागले होते. उन्हाळ्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. यामुळे टोमॅटो मधून त्यांना मोठा आर्थिक नफा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, उन्हाने या दोन्ही भावंडांचा घात केला. मोठ्या कष्टाने लावलेले टोमॅटोचं पीक वाळून गेलं. यामुळे त्यांचं दुसर्‍यांदा मोठे  नुकसान झाले. या संकटामुळे दोन्ही भावंडांच्या मनात निराशा निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात डोक्यावर कर्जाचा बोजा तयार झाला. दोन्ही भावंडांना सुचत नव्हते काय करावे, मात्र या सर्व घटनेत त्यांना काकडी या आंतरपिकाने फायदा होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा निसर्गाशी झुंजायचे आणि काकडीच उत्पन्न घेण्याचे ठरविले (Farmers Success Story).

काकडीची शेती (Cucumber Farming)

दोन्ही भावंडांनी मे महिन्यात पावसाळ्यात चालणारी ‘नामधारी’ काकडी या नवीन जातीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला संपूर्ण जळलेले टोमॅटोचे पीक त्यांनी काढून टाकलं आणि 56 गुंठे असलेल्या शेतात नांगरणी करून कंपोस्ट खत घातले. यानंतर 4 फुटांच्या सरी सोडून, कमी पाण्यात पीक वाढावं यासाठी मल्चिंग अंथरले तर प्रत्येकी सव्वा फूट जागा सोडून काकडीची लागवड केली. यावेळी मात्र निसर्गाने त्यांना साथ दिली आणि त्यांच्या या कष्टाला अखेर यश आलं. पीक चांगल्या पद्धतीने वाढू लागलं. पीक लावल्यापासून 35 व्या दिवशी काकडीचे उत्पन्न सुरू झालं. दर एक दिवसाआड पिकाची तोडणी करत असून 500 ते 600 किलो काकडी निघत आहे. पाणीदार आणि चविष्ट काकडीला कोल्हापूरसह कोकण, मुंबई या भागामध्ये तसेच विशेषतः हॉटेल मध्ये मोठी मागणी आहे. दोन्ही भाऊ काकडीचे 20 किलोचे पॅकिंग करून कोल्हापूरच्या मार्केट यार्ड येथे विकत आहेत. यातून त्यांना सर्व खर्च वजा करून आज अखेर एक लाख ते सव्वा लाख रुपयाचा फायदा झाला असून पुढे आणखी फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे (Farmers Success Story).

दोन्ही भावंडांचं ऊस आणि टोमॅटोची शेती करताना झालेल्या नुकसानात भरपाई होण्यास मदत होऊ लागली आहे. दोघे भाऊ काकडीच्या उत्पन्नातून समाधान व्यक्त करत आहेत.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या अपयशातून गेल्यावरच तुम्हाला यशाची चव (Farmers Success Story) चाखता येते याचे उत्तम उदाहरण आदिनाथ आणि कुंतीनाथ हे दोघे भाऊ आहेत.

error: Content is protected !!