Farmers Success Story: गरिबीवर मात करत, फुलशेतीतून ‘करोडपती’ बनलेला शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: श्रीकांत बोलापल्ली (Farmers Success Story) या फुलशेती (Floriculture) करणाऱ्या शेतकर्‍याने आर्थिक परिस्थितीवर मात करत करोडोचा व्यवसाय (Farmers Success Story) उभा केला.

बेंगळुरू येथील डोड्डाबल्लापुरा येथे राहणार्‍या श्रीकांत बोलापल्ली या शेतकर्‍याचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. परंतु त्याच्या दृढनिश्चयाने आणि नाविन्यपूर्ण विचाराने त्याने फुलशेती व्यवसायात (Farmers Success Stories)हे ध्येय प्राप्त केले आहे. शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी गरिबी हा कोणताही अडथळा असू शकत नाही हे त्याने सिद्ध केले आहे.

‘ओम श्री साई फ्लॉवर्स’ या कंपनीची निर्मिती (Farmers Success Story)करत सध्याच्या घडीला हा शेतकरी वार्षिक 60-70 कोटींची उलाढाल करत आहे. त्याचा हा प्रवास त्याच्यातील चिकाटी, समर्पण आणि शेतीसाठी उत्कटतेचा दर्शविते.

श्रीकांत बोलापल्ली यांच्याकडे 50 एकर जमीन आहे जिथे ते गेल्या 25 वर्षांपासून बागायती पिके घेत आहेत. यातील 10 एकर जमीन ते केवळ शिमला मिरची (Capsicum Farming) लागवडीसाठी वापरतात, तर उर्वरित 40 एकर गुलाब (Rose Farming) आणि कार्नेशनसारख्या (Carnation Farming) विविध प्रकारच्या फुलांनी सुशोभित केली आहे.

श्रीकांतची आधुनिक शेतीकडे वाटचाल (Farmers Success Story)

श्रीकांत याने आपल्या शिक्षणाचा त्याग करत अगदी लहान वयातच आपल्या कुटुंबाला हातभार लावायला सुरुवात केली. त्यावेळी, तो आपल्या कुटुंबाला कर्जमुक्त करण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळवू शकला नाही. मात्र, लवकरच त्याच्यासाठी आशेचा किरण दिसू लागला. 1995 मध्ये, त्यांना बंगळुरूला भेट देण्याची संधी मिळाली जिथे त्यांना त्यांच्या मूळ गावातील खासदाराने आयोजित केलेल्या फुलशेतीबद्दल (Flower Farming) माहिती मिळाली. यानंतर त्याने पारंपारिक शेतीकडून उच्च कृषी तंत्रज्ञानयुक्त आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली.

कृषी समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Farmers Success Stories)

सध्या त्याच्या शेतावर अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Agriculture Technology) वापर केला जातो. पॉली हाऊस, ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणाली आणि सौर पॅनेल आहेत यांचा ते शेतात वापर करतात. या आधुनिक तंत्रज्ञानाने त्यांच्या शेतीची कार्यक्षमता (Farm Efficiency) आणि उत्पादकता (Farm Productivity) वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आपल्या जुन्या आठवणी सांगतांना श्रीकांत म्हणतो, “मला पहिल्या दिवसापासून या तंत्रज्ञानाची माहिती नव्हती. हे सर्व तेव्हाच शक्य झाले जेव्हा मला बंगळुरू येथील फ्लोरिकल्चर फार्ममध्ये काम करण्याची ऑफर आली. सुरुवातीला मी चिंताग्रस्त होतो. पण तेव्हा आर्थिकदृष्ट्या माझा कठीण काळ होता त्यामुळे मी काम स्वीकारले. दिवसाचे 18 तास अथक परिश्रम करून रू. 1000 एवढ्या माफक उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांना करावे लागले. परंतु  1997 मध्ये फुलांच्या व्यापारात (Flower Business) उतरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

आव्हानावर मात केली

केवळ रु. 18,000 च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह, श्रीकांतने फुलांच्या व्यापारात आपला प्रवास सुरू केला, केवळ पहिल्याच वर्षी 5 लाखांची उल्लेखनीय उलाढाल झाली. कालांतराने, त्याच्या चिकाटीने आणि समर्पणाने त्याला 50 कोटींची उलाढाल गाठण्यात यश मिळाले (Farmers Success Story).

श्रीकांत सांगतो, “शेतकरी कुटुंबातून आल्याने, मला नेहमी मा‍झ्या शेतजमि‍नीवर फुलांची लागवड करण्याची इच्छा होती.” शेवटी, 2010 मध्ये, व्यापारातून मिळालेली कमाई जमीन खरेदी करण्यात गुंतवली ज्यामुळे त्याला फुलशेती व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. जिद्द आणि मेहनतीने त्यांनी आपली शेती 10 एकरांवरून 50 एकरांपर्यंत (Farmers Success Story) वाढवली.

इतर शेतकर्‍यांसाठी संदेश

श्रीकांत शेतीत आवड आणि समर्पणाच्या भूमिकेवर भर देतात. ते म्हणतात, “शेतकरी जे करतात ते करण्यात खरी आवड असली पाहिजे, केवळ आर्थिक नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करू नये. शेतीच्या कामाचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा,”. ते शेतकर्‍यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याचे आवाहन करतात, तसेच शेती करताना संयम बाळगणे आवश्यक आहे यावरही ते भर देतात (Farmers Success Story).