Farmers Success Story: कोल्हापूरच्या शेतकऱ्याने घेतला 50 पेऱ्यांचा लांब ऊस; तीन एकरात मिळाले 360 टन उत्पादन!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात ऊस (Farmers Success Story) तोडणी सुरु आहे, आणि यासोबतच 50 पेऱ्या लांब असलेल्या उसाची चर्चा जोरात सुरु आहे. हे घडवून आणलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Farmer) हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावातील शंकर पाटील (Shankar Patil) यांनी.

कोल्हापूर जिल्ह्यातील या शेतकर्‍याने आधुनिक पद्धतीने उसाची शेती (Sugarcane Farming) करून प्रति गुंठा विक्रमी उत्पादन घेतले आहे (Farmers Success Story). कोल्हापूरच्या या ऊस उत्पादक शेतकर्‍याची (Sugarcane Farmer) राज्यात चर्चा होत आहे शिवाय त्याच्या शेतातील लांबलचक ऊस (Longest Sugarcane) पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.

शंकर पाटील  यांनी मागील वर्षी जुलैमध्ये उसाच्या 86032 या पिकाची लागवड केली.  योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली त्यांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटील कोल्हापूरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. पण त्यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे .त्यामुळेच आजवर त्यांनी द्राक्ष, केळी, पपई अशी प्रयोगशील शेती केली आहे. सध्या त्यांच्या शेतातील लांबलचक उसाची राज्यभर चर्चा होत आहे (Farmers Success Story).

50 पेऱ्यांचा लांबलचक ऊस

पाटील यांनी जुलैमध्ये 86032 या उसाच्या जातीची निवड केली. बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लागवड केली. त्यांचे शेत मुरमाड असले तरी जमिनीत उगवण ही उत्तम झाली. एकरी 42 हजार ऊस राहावेत, यासाठी अतिरिक्त ऊस काढून उसाची संख्या मोजून घेतली. योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणे, पाण्याचे योग्य नियोजन याचा सुरेख मेळ घातल्याने पाटील यांना एकरी 120 टन उत्पादनाची हमी मिळाली, आणि तब्बल 50 पेऱ्या असलेला लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार झाला. त्यांच्या या प्रवासात त्यांना ऊस शेतीतज्ज्ञ सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे (Farmers Success Story).

पाटील यांना गुंठ्याला तीन टन उत्पादन घेण्यात यश आले आहे. जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस त्यांना तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागतेय. एकसारखा तीन एकरातील या उसातून त्यांना तब्बल 360 टन उत्पादन मिळाले आहे. यातून शंकर पाटील यांना सुमारे 11 लाख 88 हजार रुपयांचे  उत्पन्न मिळाले आहे, लागवड खर्च वगळून त्यांना 9 लाख 78 हजार पर्यंत नफा मिळणार आहे (Farmers Success Story).

error: Content is protected !!