हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या अनेक शेतकरी (Farmers Success Story) एकच सलग पीक घेण्यापेक्षा वेगवेगळ्या पिकांची मिश्र शेती (Mixed Farming) घेण्याचा प्रयत्न करतात. एकच पीक (Single Cropping Disadvantages) घेतल्याने काही नैसर्गिक समस्या आल्यास संपूर्ण पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्याऐवजी मिश्र शेतीतून सगळी पिके नष्ट न होता उत्पन्न (Farmers Success Story) मिळू शकते.
मिश्र शेती म्हणजे शेतीची ती पद्धत ज्यामध्ये वेगवेगळी पिके घेण्या सोबतच पशुपालनाचाही (Animal Husbandry) समावेश होतो. संपूर्ण आशिया व्यतिरिक्त, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, दक्षिण अफ्रिका, चीन, मध्य युरोप, नॉर्डिक देश, कॅनडा आणि रशिया या देशांमध्ये या प्रकारची शेती खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अशाच एका शेतकर्याची यशोगाथा (Shetkari Yashogatha) आज आपण जाणून घेणार आहोत.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Farmer) भोपाळ जवळील गोलखेडी गावचे रहिवासी श्याम सिंह (Shyam Singh) असे या शेतकर्याचे नाव आहे. या शेतकर्याने आपल्या मिश्र शेतीतून मोठे उत्पन्न म्हणजे वर्षाला 15 लाख रुपये (Farmers Success Story) कमवत आहेत.
कशी करतात मिश्र शेती?
श्याम सिंह (Farmers Success Story) यांच्याकडे नऊ एकर जमीन आहे. आत्मा’ प्रकल्पात सेंद्रिय आणि कृषी विविध करणाच्या मदतीने त्यांनी आपल्या नऊ एकर जमिनींपैकी दोन एकर जमिनीवर भाजीपाला (Organic Vegetable), चार एकरावर धान्य आणि दोन एकर जमिनीवर फळझाडे लावली. उर्वरित जमिनीवर सेंद्रिय खत (Organic Manure) तयार केले जाते.
श्याम सिंग यांनी कृषी विभागाच्या मदतीने पॉली हाऊस तयार केले. या पॉली हाऊसमध्ये त्यांनी भाजीपाल्याची (Polyhouse Vegetable Cultivation) लागवड केली, त्यातून त्यांना भरपूर नफा मिळाला. त्यांनी पालकाची लागवड केली होती. ज्यातून त्यांना भरपूर नफा मिळाला. श्यामसिंग यांच्या दोन एकर जमिनीवर 100 ते 125 क्विंटल पालेभाज्या मिळत आहेत. त्यांचे गाव राजधानीपासून जवळ असल्याने सेंद्रिय भाज्यांना खूप मागणी आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्थांमुळे सेंद्रिय भाजीपाला थेट ग्राहकांना पुरवला जातो, त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळतो (Farmers Success Story).
पशुपालनाचाही फायदा
श्याम सिंह शेतीसोबतच पशु पालनही करतात. यामुळे ते गावात दररोज 60 ते 70 लिटर दुधाची विक्री करतात. यातून तो दरमहा सुमारे 1 लाख 26 हजार रुपये कमावतात. श्याम सिंह यांनी शास्त्रज्ञांच्या मदतीने सेंद्रिय खत बनवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. वर्मी कंपोस्ट खत (Vermi Compost) त्यांनी तयार केले आहे.
श्याम सिंग यांनी मिश्र शेतीतून जे यश (Farmers Success Story) मिळवले आहे, ते इतर शेतकर्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे.