Farmers Success Story: काळ्या मातीच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणारा शेतकरी!

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात (Farmers Success Story) गाय आणि शेतजमि‍नीला माता या नावाने संबोधले जाते. शेतकरी जेवढे प्रेम आईवर करतो तेवढेच प्रेम तो आपल्या काळ्या मातीवर करतो. अशाच एका शेतकर्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने मातीची सुपीकता (Soil Fertility) टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची (Organic Farming) कास धरली. 

नांदेड (Nanded) शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर अर्धापूर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे देगाव (कुऱ्हाडा) या  गावाला सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. म्हणजेच सर्व दृष्टीने हे गाव स्वयंपूर्ण आहे. गावातील शेतकरी सुद्धा मेहनती आणि कष्टाळू आहेत. अशा या गावात बालाजी कदम पाटील (Balaji Kadam Patil) या शेतकर्‍याची 5 एकर शेती आहे (Farmers Success Story).

शेती बागायती असल्या कारणाने सर्वच पिके घेतली जात होती. ज्यामध्ये, सोयाबीन, कापूस, ऊस हळद, केळी पपई ही पिके आलटून पालटून घेतली जायची. परंतु ही रासायनिक शेती करताना वाढीव उत्पादना सोबतच खर्च देखील वाढतच जात होते. रासायनिक खताचा वापर देखील अधिक होत होता ज्यामुळे जमिनीची पोत (Soil Texture) खराब होत होता.

बालाजी यांचे वडील ज्ञानदेव कदम (Organic Farmer) यांच्या लक्षात ही गोष्ट आली, व त्यांनी शेतीत बदल करायचे ठरविले. 1997 – 98 साली  त्यांनी दीड एकर जमिनीवर चिकूची लागवड (Organic Chiku Farming) केली. आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणून त्यांनी या फळपिकाला कुठलेही रासायनिक खत वापरायचे नाही असे ठरविले. त्यांनी ही शेती एक प्रयोग म्हणून करायचे ठरविले होते, अगदी त्याप्रमाणे चिकूच्या झाडासाठी त्यांनी शेणखत, गोमूत्र, व शेतात तयार केलेल्या बेडमधील गांडूळ खत यांचा वापर केला (Farmers Success Story).

जेव्हा चिकूच्या झाडाला फळे लागली तेव्हा इतरांच्या तुलनेत त्यांच्या फळाचा आकार आणि गोडवा यात सुधारणा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावात व परिसरात “भाऊचे चिकू खूप गोड आहे” असे लोकांच्या तोंडून (Farmers Success Story) ऐकायला मिळत होते.

या मिळणाऱ्या कौतुकामुळे त्यांना समाधान मिळाले आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सुद्धा सेंद्रिय शेती करायला त्यांनी सुरुवात केली.

बदललेल्या काळानुसार आपण बदल करायला हवे असे बालाजी कदम यांना वाटते. सध्या सगळीकडे गुणवत्तापूर्ण नैसर्गिक सेंद्रिय उत्पादनाची मागणी वाढत आहे. त्यानुसार ग्राहकांना जे हवे आहे ते देणे गरजेचे आहे असे ते म्हणतात.

बालाजी कदम यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रवासात त्यांना आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण निरीक्षक हर्षल जैन तसेच सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक किरण कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

बालाजी कदम हे शेतकर्‍यांना सांगतात की पारंपारिक रासायनिक शेती नाकारून सर्व शेतकरी मित्रांनी सेंद्रिय शेती हा पर्याय निवडावा आणि आपल्या येणार्‍या पुढील पिढीसाठी काळ्या आईचे रक्षण (Farmers Success Story) आणि संवर्धन करावे.  

हे सुद्धा वाचा: शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची आहेत आंतरपिके; जाणून घ्या फायदे आणि आव्हाने!