Farmers Success Story: हे शेतकरी कुटुंब घेतात उसात तब्बल 16 प्रकारची आंतरपिके!

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: ऊस हे नगदी पीक (Farmers Success Story) म्हणून ओळखले जाते. या पि‍कातून हमखास उत्पन्न मिळतेच त्यामुळे बहुतेक शेतकरी या पिकात एक किंवा दोन आंतरपीक (Sugarcane Intercropping) घेतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा शेतकरी कुटुंबाबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी ऊस शेतात (Sugarcane Farming) एक किंवा दोन नाही तर तब्बल 16 आंतरपिके घेतली (Farmers Success Story).  

पेठ वडगांव, ता. हातकणंगले, (कोल्हापूर जिल्हा) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार असे या शेतकर्‍याचे नाव असून, यांचे उच्च शिक्षित कुटुंब सुद्धा त्यांच्या सोबत शेतात रमले आहे. श्रमातून शेती फुलवीत या कुटुंबाने आर्थिक प्रगती साधली आहे.

शेतीची सुरुवात

मच्छिंद्र कुंभार यांना शालेय वयापासूनच शेतीची आवड लागली. बी. कॉमचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये स्वत:ला झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. भावाला सोबत घेत घरची शेती परंपरागत पद्धतीने करण्यापेक्षा आधुनिक शेती करण्याचा निर्धार केला. घरच्या तीन एकर शेतीत ते वेगवेगळी पिके घ्यायला लागले (Farmers Success Story).

कमी खर्चात कमी मनुष्यबळात सर्वोत्तम शेतीची आयडिया त्यांना कृतिशील कामातून मिळाली. नव नवे प्रयोग करीत शेती फायदेशीर ठरू लागल्याने सर्व कुटुंबातील लोक एकत्रितपणे शेतीला व्यवसाय मानून काम करू लागले ते आजही तितक्याच ताकतीने आणि नेटाने करीत आहेत. यामध्ये घरातील महिलांनी घेतलेला पुढाकार शेती प्रगतीसाठी कारणीभूत ठरला आहे (Farmers Success Story).

उसातील आंतरपिके आणि पीक व्यवस्थापन

आंतरपीक घेत शेती करण्यात मच्छिंद्र कुंभार यांचा हातखंडा आहे (Farmers Success Story). त्यांनी आंतरपिकातून मुख्य पिकाच्या उत्पन्नाचा खर्च काढून त्यामध्येही नफा मिळविला आहे. त्यांच्याकडे उसाचे क्षेत्र जास्त आहे. या ऊस शेतीत 16 प्रकारची आंतरपिके ते घेतात. कांदा, लसूण, हिरवी मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, कोबी, मेथी, कोथिंबीर, गवारी, पालक, पोकळा, वरणा, मका, तीळ, भुईमूग या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे.

साडेचार फुटी सरीवर ऊस लावून त्यामध्ये चार सरी नंतर उसाला पूरक असणारे वरील अंतर पिके लावली जातात. उसाची सुदृढ वाढ व्हावी व ही पिकेही चांगली निघावीत अशी मशागत केली जाते तसेच खतांची मात्रा दिली जाते. या पिकांच्या उत्पन्नातून उसाच्या मशागतीसह खतांचा खर्च निश्चितपणे ते काढतात (Farmers Success Story).

गांडूळ खत व मिश्र खतांचा वापर जास्त करतात. पाण्याची संपूर्ण व्यवस्था ठिबक सिंचन द्वारे केली आहे.

मच्छिंद्र कुंभार साधारणतः दोन टन प्रमाणे उसाचे उत्पादन काढतात. तसेच ते फळबाग व फुलशेती सुद्धा करतात. झेंडूचे पीक चांगले घेतले जाते. विशेष म्हणजे सहा गुंठ्यांत त्यांनी हापूस आंबा, चिकू, पेरू, फणस, अननस, केळी या फळांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने (Organic fruit Farming) याचे उत्पादन घेतल्यामुळे ही फळे चवदार स्वादिष्ट असतात.

या फळशेतीतून घरच्यांसाठी फळे मिळतातच त्याच बरोबरच याची बाजारात विक्री केली जाते. अनेकजण शेतावर येऊन खरेदी करतात. उत्तम प्रतिच्या फळ विक्रीतून पैसेही अधिकचे होतात. सध्या त्यांनी उसाची रोपवाटिका ही सुरू केली आहे. व्हिएसआय, कोइमतूरची रोपे तयार केली जातात. उसाची निरोगी रोपे देण्यात त्यांनी प्रसिध्दी मिळवली आहे (Farmers Success Story).

कुंभार कुटुंबाने तीन एकर असणारी शेती 15 एकर केली आहे. ते नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रयोगशील शेती करतात. मच्छिंद्र यांच्या मुलांनी व दोन मुलींनीही शेतीच्या अनुषंगाने बीएसस्सी (कृषी) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  नोकरीऐवजी ते  वडिलांसोबत शेती करतात. मच्छिंद्र यांनीही मुक्त विद्यापीठातून बीएसस्सी हॉर्टीकल्चर व अॅग्रीकल्चरची डिग्री घेतली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले.

सन्मान आणि पुरस्कार (Farmers Success Story)

मच्छिंद्र कुंभार यांचे शेतीतील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नामवंत चौदा पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ,(Vasantrao Naik Shetinishtha Award) वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (krushibhushan Puraskar)मिळाला आहे. तर त्यांची पत्नी अनिता व त्यांच्या भावाची बायको सुशिला कुंभार यांनी सोयाबीन पीक स्पर्धेतील राज्य पातळीवरील द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे.

मच्छिंद्र कुंभार यांनी आता पर्यंत शेती प्रगतीवर 500 व्याख्याने दिली आहेत. कृषी कॉलेज मध्ये तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या कार्यशाळेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले जाते. कृषी महाविद्यालयामध्ये गेस्ट लेक्चर साठी जातात. प्रत्यक्ष शेतीत काम करीत असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी होतो. त्यामुळे शेतीतील मार्गदर्शक अशी त्यांची कृषी क्षेत्रात ओळख (Farmers Success Story) निर्माण झाली आहे.

एकूणच शेतीवर प्रचंड निष्ठा प्रेम ठेवून हे कुटुंब शेतात परिश्रम करीत आर्थिक उन्नतीकडे झेपावले आहे. तरुण मुले, मुली यांनी शेतीकडे वळून कृषी परंपरेला आधुनिकतेची जोड देत ती जोपासली पाहिजे. शेतीला कमी लेखून चालणार नाही. शेती हाच अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ती विकसित करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा असे आवाहन कुंभार कुटुंबियांनी केले आहे.