‘या’ देशी गायींचे पालन केल्यास शेतकरी होतील मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात देशी गायींचे पालनपोषण केल्यास अधिक फायदा हा शेतकऱ्यांना होतो. शेती व्यवसायात पशुपालन हा जोडधंदा आहे. पशुपालन म्हटलं की लगेचच दुग्ध व्यवसाय हा देखील पर्याय उपस्थित राहतो. दुग्धव्यवसायात दुधापासून बनणारे पदार्थ दही, ताक, दूध, लोणी असून या दुधापासून चांगले उत्पन्न मिळवले जाते. मात्र यासाठी दूध देणाऱ्या गायीबाबत माहिती लेखाद्वारे सांगणार आहोत.

बहुतेक राज्यात गोपालन करण्यासाठी सरकार अनुदान देतंय. यासाठी सरकार हजारो रुपये अनुदान देत आहे. काही राज्यात शेतकऱ्यांना गोपालनास सहकार्य केले जात असून छत्तीसगड सरकार गाईचे शेण, गोमूत्र विकून चांगली कमाई करू शकतात. यासाठी पुढील दिलेल्या तीन प्रकारच्या जातीच्या गाई जास्त दूध देतात.

१) गीर गाय : पशुपालनासाठी गीर गाय ही अधिक दूध देणारी गाय आहे. दिवसाला जवळजवळ १५ ते २० लिटर दूध देते. या गाईच्या दुधापासून आर्थिक येणं हे भरभक्कम असून याचा मोठा फायदा गीर गाय पशुपालकाला होतो. या जातीची गाय गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानात दिसते.

२) सहिवाल गाय : ही गाय १० ते २० लिटर दूध देणारी गाय आहे. सहिवाल गाय ही देशी गाय असून योग्य काळजी घेतली तर दूध उत्पादनात अधिक वाढ होते. या गायीचे शरीर हे लांब स्वरूपात असून या गायीचा उगम हा पाकिस्तानचा आहे.

३) लाल सिंधी गाय : हरियाणा, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील शेतकरी या गायी पाळतात. या गायीचा मुळ उगम पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. शेतकरी लाल सिंधी गायीचे पालन करत असतील तर दूध विकून चांगली कमाई होते.

error: Content is protected !!