पेरणीपूर्वी 1 एकरमध्ये शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे एका एकरामागे प्रती दहा हजार रुपये विभागीय देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे. याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी मेळाव्यात सांगितलं. तसेच इतरही मुद्दे मांडले आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, राज्यातील सरकार हे बळीराजाचे सरकार आहे. पालघरमधील मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गाच्या शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर असण्याच्या घटनेबाबत संपूर्ण माहिती मिळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे योग्य ती कारवाई करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं. तसेच युरियाचा काळाबाजार रोखण्याबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. पालघरमध्ये युरिया खताचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. तर यावर बोलताना, पालघरमध्ये होत असलेला युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिलं.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग कारवाई आणण्यात येणार असल्याच्या चर्चांवरही सत्तार यांनी सूचक विधान केलं आहे . लोकशाहीच्या राज्यात कुणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असल्यास किंवा विनाकारण बदनामी केल्यास त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो. त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात, असं त्यांनी म्हंटल.

error: Content is protected !!