Farming Business Idea : या पिकाची एकदा लागवड करा अन ३० वर्ष फक्त पैसे घ्या; कमी खर्चात अधिक नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतीय बाजारात मेहंदीला महत्त्वाचे स्थान आहे. (Farming Business Idea) अनेक राज्यांमध्ये मेहंदीची चांगली लागवड केली जाते. केसांना चमक देण्यासाठी अनेक लोक मेहंदीचा उपयोग करतात. याशिवाय लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांच्यावेळी सौंदर्याचा भाग म्हणून हातावर मेहंदी काढण्याची भारतीय संस्कृतीत पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जर मेहंदीची लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळू शकते.

त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

या प्रकारचे हवामान मेहंदी लागवडीसाठी योग्य आहे –

मेहंदी लागवडीसाठी (mehandi Lagvad) वालुकामय जमीन योग्य आहे. यासोबतच खडकाळ, खारट, क्षारयुक्त जमिनीवरही त्याची लागवड करता येते. जमिनीचे pH मूल्य 7.5 ते 8.5 असावे. वास्तविक, मेंदीचे रोप सर्व प्रकारच्या कोरड्या आणि उष्णकटिबंधीय हवामानात चांगले वाढते. (Farming Business Idea)

मेंदीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

मेंदी पेरणीसाठी सर्वात अचूक वेळ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आहे. तुम्ही थेट बियाणे किंवा रोपे लावून त्याची लागवड सुरू करू शकता. शेतात असलेले सर्व तण उपटून टाका. कल्टिव्हेटरने शेत नांगरल्यानंतर, स्क्रिड चालवून समतल करा. यानंतर, मेंदी लावा.

२०-२५ वर्षे मेहंदी पिकाचे फायदे (Farming Business Idea)

मेहंदीची रोपे वर्षभर चांगली तयार केली जातात. एकदा लागवड केल्यावर त्यांचे पीक २० ते २५ वर्षे टिकते आणि इतकी वर्षे तुम्हाला लाभ देत राहते. मेहंदी पिकाच्या ३ ते ४ वर्षांनी, दरवर्षी सुमारे १५-२० क्विंटल प्रति हेक्टर कोरड्या पानांचे उत्पादन होते. अशा परिस्थितीत मेहंदीची लागवड करून शेतकरी वर्षानुवर्षे लाखोंची कमाई करू शकतात.

मेंदीच्या शेतीतून कमी खर्चात जास्त नफा

मेंदीची लागवड करण्यासाठी फारसा खर्च येत नाही. तसेच मेहंदी पिकावर कोणत्याही प्रकारची कीड पडत नाही. यामुळेच कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून मेहंदीकडे पहिले जाते. तसेच भारतीय बाजारपेठेत मेहंदीची मागणी कायम असते. मोठ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन विकून शेतकरी थेट नफा मिळवू शकतात. हे पीक खराब होण्याची शक्यताही कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत नाही. औषधी गुणधर्मामुळे मेहंदीचे पीक प्राणीही खात नाहीत. तसेच चोरही त्याची चोरी करत नाहीत. त्यामुळे मेहंदीचे पीक घेण्यास कोणतीच रिस्क नसल्याने शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचे ठरू शकते.

error: Content is protected !!