हॅलो कृषी ऑनलाईन: चक्रीवादळ ‘फेंगल’ (Fengal Cyclone Weather Alert) तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे येत असल्याने, बहुतांश भागात मुसळधार आणि व्यापक पावसाची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फेंगल चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. “ते उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि 30 तारखेच्या सकाळपर्यंत कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळ, जे पुढील 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस, (Heavy Rainfall In Tamil Nadu) जोरदार वारे आणि संभाव्य पूर येण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावाखाली, पुढील 2-3 दिवसांत तामिळनाडूच्या बहुतेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात येत आहे. झारखंडमध्ये ‘फेंगल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे धुके आणि आंशिक ढग असण्याची शक्यता आहे (Fengal Cyclone Weather Alert).
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुसळधार पावसाचा अंदाज (Fengal Cyclone Weather Alert) असल्याने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज आणि उद्या 30 नोव्हेंबर रोजी बंद राहतील, असे पुद्दुचेरी सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय नौदलाने सर्वसमावेशक आपत्ती प्रतिसाद योजना सक्रिय केली आहे. मच्छिमारांना 31 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
फेंगल चक्रीवादळाचा राज्यात परिणाम (Weather Update Maharashtra)
दरम्यान राज्यातही फेंगल चक्रीवादळाचा (Fengal Cyclone Weather Alert) परिणाम दिसत आहे, सध्या राज्यात कडाक्याची थंडी (Cold Wave In Maharashtra) पडत असून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. उत्तर आणि उत्तर—पश्चिमी वारे आणि आकाशातील निरभ्र वातावरण सध्याच्या तापमानातील घसरणीला कारणीभूत आहे, ज्यामुळे जमीन वेगाने थंड होत आहे असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. सध्याचे तापमान पुढील काही दिवस कायम असून दिवसाचे तापमान वाढले असले तरी रात्री थंडीत झपाट्याने वाढ होत आहे.
मुंबईत आज 16.5 अंश सेल्सिअस आणि पुण्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. अहिल्यानगर मधील तापमान 8.3 अंश सेल्सिअसवर म्हणजेच महाबळेश्वरपेक्षाही कमी आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वाधिक पारा घसरला आहे. या परिसरात 6 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. संभाजीनगर आणि नाशिकमध्ये 10.6 अंश सेल्सिअस तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. यंदा कडाक्याची थंडी पुण्यात जाणवू लागली आहे. वर्षीतील हे पहिलेच एक अंकी किमान तापमान नोंदवले गेले आहे.