Fake Fertilizer: बोगस खत प्रकरणी कारवाईच्या भीतीने खत विक्रेत्याने केले ‘हे’ कार्य!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जालना जिल्ह्यात बोगस खतांचा (Fake Fertilizer) प्रकरण गाजत असताना आता यासंबंधी एक नवीन बातमी समोर आलेली आहे. बोगस खत विक्री करणाऱ्या विक्रेत्याने (Fertilizer Dealer) हजारो खतांच्या गोण्या पडीक विहिरीमध्ये फेकून दिलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून संबंधित खत विक्रेत्या कंपनीवर कठोर कारवाई करावी तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation To Farmers) द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून होत आहे.

जालना जिल्ह्यात (Jalna District) शेकडो हेक्टर वरील पिके बोगस खतामुळे (Fake Fertilizer) करपून गेल्याची घटना उघडकीस आली, पाच ते सात गावातील शेतकर्‍यांचे यामुळे नुकसान झाले. बोगस खताची विक्री करणाऱ्या कंपनी चालकावर भोकरदन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला कृत्रिम खत टंचाई (Fertilizer Shortage) निर्मिती करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील अनेक कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून झाला. यातूनच मग उपलब्ध नसलेले खताऐवजी नवीन कंपन्यांची खते निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यापैकीच गुजरात येथील सरदार फर्टीलायझर कंपनीचे पोटॅशची परतुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली.

या खतामुळे (Fake Fertilizer) कापूस, टरबूज, पपई या सर्व पिकांची वाढ रोखली असून ही पिके करपू लागली आहेत. आपल्या खतांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कंपनी मालकाने ही खते परस्पर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भोकरदन येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली.

भोकरदन येथील एका पडीक विहिरीमध्ये तब्बल हजारो पोटॅश खताच्या बॅग (Potash Fertilizer Bags) नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. यानंतर गणेश गवते या कंपनीच्या मॅनेजरवर एफआयआर दाखल झाला आहे. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे नुकसान झालेले शेतकरी पिकांच्या नुकसानीचा पंचनामा कृषी विभागाने करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहेत .

error: Content is protected !!