Fertilizer Managment : या वर्षी अनेकांच्या पेरण्या लांबल्याने आता ऑगस्ट उजाडला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात सोयाबीन, कापूस या पिकांवर हुमणी सोबत अन्य किडीचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. सोयाबीनची पाने पिवळी पडताना दिसत आहेत. सध्या अनेक शेतकरी विद्राव्य खतांचा वापर करतात. मात्र या खतांची वैशिट्ये सविस्तर अनेकांना माहिती नसतात. पिकांना ठिबक सिंचनमधून व फवारणीद्वारा दिली जाणारी विद्राव्य खते कशी असावीत त्यांची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
१ पाण्यात पूर्णतः विरघळणारी खते (विद्राव्य) – ही खते एक – दोन किंवा तीन (बहू) पोषक अन्द्राव्याचे असलेले असून ती पाण्यात टाकली असता ताबडतोब विरघळतात. हे बहुमुल्य अन्द्राव्याचे द्रावण सिंचनाच्या पाण्यासोबत देणाऱ्या क्रियेलाच फर्टीगेशन असे संबोधिले जाते.
२ विद्राव्य खतांचा वापर- ठराविक सिंचन पद्धतीतून (ठिबक अथवा सूक्ष्म तुषार) नगदी पिकाच्या उत्पादनासाठी शेतात व तसेच संरक्षित वातावरण निर्माण करता येईल अशा ग्रीन हाउस, शेड नेट मध्ये वाढविल्या जाणाऱ्या पिकांसाठी केला जातो. ही खते फुलशेती भाजीपाला, फळबाग, बागेतील / घरात येणाऱ्या कुंड्यातील सुशोभीत झाडांकारीता वापरता येतात.
३ ठिबक सिंचामध्ये : पिकांची मुळे ठराविक क्षेत्राममध्येच वाढतात. या करिता तेथील माती परीक्षण वरचेवर करणे आवश्यक आहे . त्या माध्यमात पिकांच्या वाडीबरोबरच पोषक द्रव्य्रांचे प्रमाण सतत घटक असल्या कारणाने त्यांचा ठिबक सिचनातून ठराविक प्रमाणात नेहमी खते योग्य राहील.
४ खतांचे प्रामाण : जास्त झाल्यास व पाण्याचा पुरवठा मर्यादित असल्यास खतांचा क्षारभार जमिनीत वाढेल व त्यामुळे झाडांतील अन्नरस उलट प्रवाही होऊन अति क्षारामुळे जमिनीत शोषला जाईल व झाडाची वाढ खुंटून ती मरू शकतात.
५ विद्र्व्य खतांची तीव्रता : ठिबक सिंचनातून खते देतांना खतांचा क्षारभार (सोल्ठ इंडेक्स) किती आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. जर सर्वच खते अति क्षाराची दिली तर झाडांना ती खते शोषून घेण्याकरिता लागणारा दाब (Osmotic Pressure, Turgure pressure) पुरेसा नसेल तर झाडांना मुळाकडे आधिक उर्जा द्यावी लागेल आणि त्यामुळे फुलधारणा, होणेस विलंब होतो. साहजिकच त्यामुळे फळाच्या काढणीस विलंब होतो बहार अकाली पुढे जातो त्या खतांची तीव्रता (Concentration) अति प्रमाणात असल्यास झाडांची मर होण्यांची शक्यता आहे विद्राव्य खतांचा क्षारभार ४० ते ५० दरम्यान ठेवला तर ती सर्व पोषकद्रव्ये मुळाच्या केशतंतू विनासायास पिकांना पूर्णत: उपलब्ध होतात.
६ सामू – झाडांच्या मुळाच्या केशतंतू जवळील, जमिनीचा सामु ६ ते ७ असल्यास झाडे पोषकद्रव्ये आदिकाधिक शोषून घेऊ शकतात. आपल्याकडील जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ७.५ ते ८ असल्याकारणाने फॉस्फरस, पोटॅश, मग्नेशियमच्या कमतरतेबरोबर लोह, मंगल (मॅग्नीज) जस्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर आढळते. तेव्हा ठिबक सिंचनातून देणारी खते ही आम्लयुक्त (अॅसिडीक) ज्यामुळे ठिबक सिंचनाच्या पाण्याचा सामू ५.५ ते ६ पर्यंत आणू शकतील, तसेच दिलेली खते केशतंतू जवळ पोहोचल्यानंतर तेथे देखील त्या खतामुळे आम्लधर्मी सामू तयार होईल अशी विद्राव्य खते आम्ल युक्त असल्यामुळे ताबडतोड लागू पडतात. शिवाय सिंचनाच्या लॅटरल, ड्रिपर, नोझल इत्यादीमध्ये क्षाराचा साका साठत नाही आणि स्वतंत्रपणे अॅसिड वॉश देण्याची गरज पडत नाही. आम्लधर्मीय खताची मात्रा ८५ ते ९० टक्के पूर्णत: लागू पडते. हे गुणधर्म असलेल्या खत कंपन्याचीच खते वापरावीत.
७ सुक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खते – सुक्ष्म पोषक द्रव्यापैकी लोह, मंगल (मँगनीज) व जास्त ही झाडास / पिकास जमिनीचा सामू ४.४ ते ५.५ असल्यास उपलब्ध होऊ शकतात. परंतु एवढा जमिनीचा सामू खाली आणणे धोकादायक असून त्या जमिनीत अॅल्युमिनियम व लोह, स्फुरदाची उपलब्धता झाडांना अजिबात होऊ देत नाही. व त्याचे स्थिरीकरण होईल अॅल्युमिनियमचे स्फुरदयुक्त क्षार पिकांना अपायकारक ठरतात. लोह, मंगल व जस्त शक्यतो चिलेटेड फॉर्म मध्ये देणे अत्यंत आवशक आहे. चिलेटेड म्हणजे पूर्णत: रासायनिक प्रक्रियेने लोह, मंगल व जस्तेचे मेंटॅलिकेशन सेंद्रिय पदार्थात करणे उदा: इथिलीन डाय अमीनटेट्रा अॅसीटेड (ई.डी.टी.ए) यामध्ये या मूलद्रव्यांचे अणु वेष्ठीलेले असतात. त्यामुळे त्यांची विद्राव्यता वाढते, जेणेकरून ते फवारणी अथवा पाण्यापासून दिले असता झाडांना सहज सुलभरीत्या उपलब्ध होऊन कार्यरत होतात. ही सुक्ष्म द्रव्ये नत्र, स्फुरद, पालाशयुक्त मिश्रणामधुन दिली असता त्यांची उपलब्धता कमी होते. म्हणून हायसोल उत्पादीत मायक्रोसोल किंवा १९:१९:१९ सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त ग्रेड प्रति एकर शक्यतो फवारणीने (१२५ ते २५० ग्रेम २५० लिटर पाण्यात प्रति एकरी प्रति आठवडा) याप्रमाणे दिलेले सूक्ष्म द्रव्यांची कमतरता दिसून येत नाही.
८- खताची विद्राव्यता – ठिबक सिंचानातून देणाऱ्या खतांची विद्राव्यता (Solubility) किती आहे हे पाहणे आवश्यक आहे. एक लिटर पाण्यात १५० ग्रॅम हायसोल एन.पी.के खत टाकल्यास ते पूर्णत: पाण्यात ५ ते ७ मिनिटात विरघळते तसेच हयसोल के (पोटेशियम सल्फेट) १०० ग्रॅम विरघळते. म्हणजेच त्याची विद्राव्यता अनुक्रमे १५ ते १० टक्के आहे. (तक्ता क्र ४.२ मध्ये विविध विद्राव्य खतांचे पाण्यात विरघळण्याचे प्रमाण दिलेले आहे) या तीव्रतेच्या खतां
चा सामू २ ते ३.५ पर्यंत असल्या कारणाने द्रावण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सोडण्यापूर्वी १० पट (१०० लिटर) पाण्यामध्ये मिसळलेले असता त्याचा सामू ४ ते ५.५ पर्यंत होतो व ते द्रावण व्हेंचुरी अथवा एचटीपी वा डोझामेट्रिक तत्सम प्रकारच्या पंपाने (किंवा) फर्टीलायझर टँक वापरल्यास सिंचन पाण्याच्या दाबाने ठिबक सिंचन पद्धतीमध्ये देणे सोईस्कर होते व त्या सिंचन पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ पर्यंत होतो हे विशेष महत्वाचे आहे.
९ विद्रव्य खतांचे स्वरूप (फॉर्मुलेशन) – विद्राव्य खताच्या द्रावणातून उपलब्ध होणारी पोषकद्रव्ये पिकांना ताबडतोब शोषून घेता येईल अशा स्वरुपात असावीत. उदा. हायसोल मधील नत्र १० टक्के ते २५ टक्के नायट्रोजन फॉर्म मध्ये व ९० ते ७५ टक्के अमोनिकल व नंतर नायट्रेट स्वरुपात होण्यास ७ ते १२ दिवस लागतात तेव्हा अमाईड नत्र ऊस / कापूस व ऊस पिकांना घ्यावयास हरकत नाही. परंतु भाजीपाला, फळभाजी, फुल शेती व फळ बागांकरिता (बहराच्या वेळी) अमाईड खते देण्याचे टाळावे कारण ज्यादिवशी ते ठिबक सिंचनातून दिले जाते. त्याच दिवशी अथवा पुढील दोन ते तीन दिवसात लागू न पडल्याने पिकांची / झाडांची वाढीव पुढील पंधरा दिवसात बदलते व नको असतांना नत्रांचे प्रमाण जमिनीत व त्याचा विपरीत परिणाम होण्याचे टाळता येत नाही.
१० विद्राव्य खतांची तीव्रता – अति तीव्र (विद्राव्य खतांच्या) द्रावणामुळे त्या पोषकद्रव्यांचे इतर पोषकद्रव्याबरोबर व जमिनीत असणाऱ्या इतर घटकांबरोबर स्थिरीकरण होऊन खतांच्या ज्यादा दिलेल्या मात्रांचा दुष्परिणाम, शिवाय विनाकारण ज्यादा खर्च होतो. जमिनीच्या व जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील क्षार विशेष, क्लोराईड्स, नायट्रेट्रस, कार्बोनेट्स वाढविण्यास आपणच कारणीभूत होतो. हे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच योग्य तीव्रतेचीच विद्राव्य खते घ्यावीत.