हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामासाठी खताच्या किमती (Fertilizer Rate) मागील वर्षीप्रमाणेच राहणार आहेत. सध्या राज्यात खरीप हंगामाची (Kharif Season Preparation) पूर्व तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागा (Agriculture Department) मार्फत सुद्धा यंदाच्या खरीप हंगामात पिकांच्या गरजेपेक्षा अडीच लाख टन जास्त खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच, खतांच्या किमतीतही कोणतीही वाढ (Fertilizer Rate) करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
खतपुरवठा आणि दर (Fertilizer Rate)
राज्यात यावर्षी 48 लाख टन खत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्राला 45.53 लाख टन खतपुरवठा द्यायचे मंजूर केले आहे. मंजूर खतात युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी यांचा समावेश आहे.
1 एप्रिल ते 31 मे 2024 पर्यंत 31.54 लाख टन खतसाठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. युरिया वगळता इतर खतांचे अनुदान केंद्र सरकार देते. युरियाची किंमत 45 किलो प्रति गोणी 266.50 रुपये आहे. डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी यांच्या किंमती 50 किलो प्रति गोणी 1350 ते 1700 रुपये पर्यंत आहेत.
युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा
युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा करण्यात येणार आहे. युरियाचा 1.5 लाख टन आणि डीएपीचा 25 हजार टन साठा उपलब्ध असेल.
कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी शेतकर्यांना माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित (Soil Test For Fertilizer Application) वापर करण्याचे आवाहन केले आहे.
खतांच्या किमती (Fertilizer Rate) न वाढविण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. खतांच्या उपलब्धतेमुळे (Fertilizer Availability) पिकांना योग्य पोषण मिळेल आणि उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.