अखेर जयकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु; रब्बी पिकांना मिळणार संजीवनी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी

पाथरी तालुक्यात जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रावर रब्बी पिकच्या पेरण्या पाण्याविना रखडल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमधून जयकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. मात्र आज दि. 18.11.2022 रोजी मा. कार्यकारी अभियंता, जापावि, नान (उ), पैठण यांच्या आदेशानुसार पैठण डाव्या कालव्यातून दुपारी ठिक २:00 ते ३:00 वा. दरम्यान विसर्ग सुरू करून 100 Cusec कालवा मुखाशी स्थिर करण्यात आला. विशेष म्हणजे पुढील आदेशापर्यंत विसर्ग स्थिर राहील असेही विभागाकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी पिकांना संजीवनी मिळणार आहे.

पाण्याअभावी रखडल्या होत्या पेरण्या

( जि . परभणी ) पाथरी तालुक्यातील रब्बी पिकांच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे .परंतु जायकवाडीच्या पाण्यावर विसंबुन असणारा ऊस उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडला होता. कार्यक्षेत्रातील सर्व साखर कारखाने चालू न झाल्याने ऊस तोडणी येईपर्यंत ऊसाला पाणी देणे एकीकडे गरजेचे असताना जायकवाडी विभागाकडून पाणी आवर्तनाचे नियोजन न झाल्याने शेतातील ऊस पिक जोपासायचा कसा ? असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांकडे पडला होता.

ऊस पिकाला पाण्याची होती नितांत गरज

यावर्षी जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरण ऑगस्ट पूर्वीच ओव्हर फ्लो झाले .त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यासह रब्बी हंगामामध्ये भुईमूग , गहू इत्यादी पिके घेण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत .सध्या ज्वारी ,हरभरा या रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश पेरणी होत आली आहे .तर गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकरी तयारी करत आहे .याशिवाय पावसाळा संपून तीन आठवड्याचा कालावधी लोटला असून शेतातील ऊस पिकाला पाण्याची नितांत गरज आहे .मागील वर्षी उसाची जॅमिग असल्याने गाळपासाठी उशिरा ऊस गेला होता . हा ऊस आणखी काही महिने जोपासना करणे गरजेचे आहे तर कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने सुरू न झाल्याने सध्या ऊस शेतात उभा आहे .यातील बहुतांश ऊस हा जायकवाडीच्या पाणी आवर्तनावर शेतकऱ्यांनी लागवड केलेला आहे .

आता या सर्व उसाच्या फडांना गाळपाला जाईपर्यंत पाणी देणे गरजेचे असताना पाणी आवर्तन सोडण्यासंदर्भात जायकवाडी विभागाकडून कोणतीच हालचाल होताना दिसून येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. वेळेवर पाणी न भेटल्यास उसाच्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका ही बसण्याचा धोका होता . त्यामुळे संबंधीत विभाग पाणी आवर्तन सोडण्यासाठी नियोजन कधी करणार असा प्रश्न स्थानिक शेतकरी करू लागले होते. मात्र अखेर शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून विभागाने आज जायकवाडीच्या पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

error: Content is protected !!