हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय (Food Processing Business) सुरु करण्याचा विचार करत असतात. माहितीअभावी आणि भांडवलाअभावी तरुण व्यवसायामध्ये उतरण्यासाठी मागे पडत असतात. मात्र, आता तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आज आपण अशा एका व्यवसायविषयी जाणून घेणार आहोत. ज्यास गुंतवणूक कमी करावी लागेल आणि त्यातून तुम्हाला नफाही चांगला (Food Processing Business) मिळू शकतो.
कमी गुंतवणुकीत अधिक नफा (Food Processing Business For Farmers)
तुम्ही छोटेखानी स्वरूपात बटाटा चिप्स बनविण्याचा विचार करू शकतात. हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. यासोबत तुम्ही तांदळापासून कुरकुरे बनविण्याचा विचार देखील करू शकतात. बटाटा चिप्स बनविण्याची पद्धत खूप सोपी आहे. मोठे चिप्स बनवायचे असतील तर मोठ्या मशीन्सची गरज पडेल. कमी गुंतवणूक आणि कमी जागेत तुम्ही स्वतःचा बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय (Food Processing Business) कसा सुरू करू शकतात.
बटाटा प्रक्रिया उद्योग
बटाटा चिप्स मशीन : बटाटा चिप्स बनविण्यासाठी तुम्हाला केवळ 850 रुपयांचे एक मशीन खरेदी करावे लागेल. महत्वाचे म्हणजे कच्च्या मालासाठीही काही खर्च करावा लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कच्चा माल १०० ते 200 रुपयांना मिळेल. हे मशीन तुम्हाला ऑनलाइन सहज मिळू शकते. बटाटा चिप्ससाठी तुम्हाला बटाटा, मीठ, पाणी, तेल हे साहित्य लागणार आहे.
चिप्स बनविण्याची घरगुती प्रक्रिया : बटाटे धुवा, सोलून घ्या आणि पातळ काप करा. सर्वात चांगले म्हणजे भाज्या सोलण्यासाठी चाकू वापरा. तुकडा सुमारे 2 मिमी जाड असावा. त्यानंतर बटाट्याची मंडळे पाच मिनिटे पाण्यात ठेवा. या कालावधीनंतर पाणी काढून टाका आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने भरतो. बटाटे पारदर्शक होईपर्यंत आणि पाणी पांढरे होणे थांबेपर्यंत प्रक्रिया पार पाडा. ही प्रक्रिया बटाट्यांमधून सर्व स्टार्च बाहेर काढण्यास मदत करते. पॅन गरम करा आणि एक सेंटीमीटर जाड तेल घाला. बटाट्याचे तुकडे दोन्ही बाजूंनी तळून घ्या, नंतर प्लेटवर ठेवा, भरपूर मीठ शिंपडा आणि थंड होऊ द्या.
तांदूळ प्रक्रिया उद्योग
तांदळाचे कुरकुरे बनविण्याचे मशीन : कुरकुरे बनवण्यासाठी तुम्ही जर मशीन विकत घेणार असाल तर बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या मशिन्स उपलब्ध आहेत. त्या तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकतात. तुमच्या बजेटनुसार मशीन घेऊन तुम्ही मशीन विकत घेऊन कुरकुरे बनवू शकतात.
मशिनशिवाय तुम्ही कच्चे कुरकुरे सुद्धा होलसेलमध्ये विकत घेऊन, त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स टाकून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे पॅक करून विकू शकतात. अशाप्रकारे व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकतात. तांदळापासून कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ, जिरे,कलोंजी (काळे तीळ), पाणी, हळद, तळण्यासाठी तेल, मीठ, साखर हे साहित्य लागणार आहे.