Food Processing : असा सुरु करा खाद्यतेलनिर्मिती व्यवसाय; लागते ‘ही’ यंत्रसामुग्री, मिळेल बक्कळ नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि अन्य तेलबिया पिकांना योग्य भाव (Food Processing) मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया निर्मिती उद्योग किंवा खाद्यतेलनिर्मिती उद्योगात उतरणे, गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता तुम्हीही आपल्या ग्रामीण भागात कमी खर्चात एखादा चांगला व्यवसाय सुरु करू इच्छित असाल तर तुम्हाला वर्षभर चांगला नफा मिळू शकेल, असा खाद्यतेल निर्मिती व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण खाद्यतेल निर्मिती व्यवसायाबद्दल (Food Processing) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

असा सुरु करा तेल गिरणी व्यवसाय (Food Processing Oil Mill)

आपल्या देशातील तेल व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. अधिक लोकसंख्येचा देश असल्याने खाद्यतेलाला बाजारात (Food Processing) नेहमीच मोठी मागणी आहे. कारण खाद्यतेलाला हे घराघरात वापरले जाते. ज्यामुळे तुम्हाला नेहमीच अधिकचा नफा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त काही आवश्यक तयारी करावी लागेल, त्यानंतर तुम्ही तेलाचा यशस्वी व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल आवश्यक आहे.

किती भांडवल आवश्यक?

तेल गिरणीसाठी एफएसएसएआयचा परवाना आणि नोंदणी आवश्यक आहे. तेलनिर्मितीसाठी कच्चा माल जवळच असावा. तेल काढण्याची यंत्रणा आणि तेल गोळा करण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्या किंवा टिनचे डबे देखील वापरू शकतात. अर्थात तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केलात तर तुम्हाला सुमारे 2 ते 3 लाख रुपये भांडवलाची आवश्यकता भासणार आहे.

‘ही’ यंत्रे आवश्यक?

खाद्य तेल काढण्याचे यंत्र : खाद्य तेल काढण्याच्या यंत्रात बिया एकत्र दाबून तेल काढले जाते. ही एक सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तेल आणि तेल केक(पेंड) दोन्ही वेगळे होतात. तुम्ही बाजारात केक विकूनही नफा कमवू शकतात. कारण केकचा (पेंडचा) वापर शेतकरी जनावरांसाठी खाद्य म्हणून करतात. खाद्यतेल एक्सपेलर मशीनची भारतीय बाजारपेठेत किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये दरम्यान आहे.

तेल फिल्टर मशीन : तेल फिल्टर मशीनमध्ये तेल फिल्टर करून पॅकेजिंगच्या स्वरूपात तयार केले जाते. भारतीय बाजारपेठेत हे यंत्र खूपच किफायतशीर आहे. याशिवाय ऑइल मिलमध्ये लोकांना अधिक मशीनची गरज आहे. जसे की तेलाचे बाटली सील करण्यासाठी मशीन किंवा टिन आणि तेलाचे वजन मोजण्यासाठी मशीन इत्यादी. आवश्यक आहे.

error: Content is protected !!