हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रामध्ये टरबूज लागवड (Food Processing) मोठ्या प्रमाणात केली जाते. एकंदरीत देशाचा विचार केला असता उत्तर भारतातील मैदानी भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व ती फेब्रुवारी महिन्यात केली जाते. काही नद्यांच्या काठावर देखील लागवड करतात व ती लागवड नोव्हेंबर ते मार्च पर्यंत करतात.तर आपण टरबुजाच्या मार्केट दराचा विचार केला तर कधी टरबुजाला चांगला भाव मिळतो. तर कधी शेतकऱ्यांना बेभावात आपला टरबूज विक्री (Food Processing) करावा लागतो.
मिळेल भरघोस नफा (Food Processing Business For Farmers)
परिणामी, अशावेळी शेतकऱ्यांनी टरबूज प्रक्रिया उद्योगाचा (Food Processing) मार्ग पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. किंवा मग दरवर्षी टरबूज लागवड करणारे शेतकरी टरबूज प्रक्रिया उद्योगात उतरू शकतात. टरबुजाला उन्हाळाभर पाणी भरूनही शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यास मोठा आर्थिक बसतो. अर्थात टरबूज बाजारांमध्ये विकून पैसा मिळतो. परंतु टरबूजपासून इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात व ते विकून भरघोस नफा मिळवता येणे शक्य आहे. याच पार्श्वभूमीवर आज टरबूजपासून कोणते प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करता येऊ शकतात. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
बनवू शकतात ‘हे’ पदार्थ
टरबूज आईसक्रीम : सध्या उन्हाळा सुरु असल्यामुळे आणि टरबूज जास्त करून उन्हाळ्यात बाजारपेठेत दाखल होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कुल्फी किंवा आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे कुल्फी किंवा आईस्क्रीममध्ये टरबूजचा प्रभावी वापर करता येतो. तुम्ही टरबूजपासून आइस्क्रीम आणि कुल्फी (Food Processing) बनवणे शिकलात तर तुम्हाला चांगला नफा मिळवता येऊ शकतो. या टरबूजपासून बनवलेले आईस्क्रीमला वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम कंपन्या खरेदी करतात. त्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो.
टरबूजच्या सालीपासून बनते टूटीफ्रूटी : प्रत्येक जण टरबूज खाऊन झाले की त्याचे साल फेकून देतात. मात्र, या टरबुजाच्या सालीपासून टुटी फुटी बनवता येते. ही टरबूजपासून बनवलेली टूटीफ्रूटी बाजारात दुकानदारांना विकून चांगला नफा कमवू शकतात. टरबुजाची चटणी देखील करता येते या चटणीला बाजारात नेहमी चांगली मागणी असते.
सौंदर्य उत्पादनांमध्ये टरबुजाचा उपयोग : प्रत्येक जण त्वचेची निगा राखण्यासाठी जागरूक झाले आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी टरबूजमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामाध्यमातून तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवून निरोगी ठेवतात. टरबुजाचा वापर करून तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकतात. लॅक्मेसारख्या मोठ्या कंपन्या देखील टरबूज वापरून सौंदर्य उत्पादने बनवत आहेत. टरबुजाचा वापर करून सौंदर्य उत्पादन तयार करून या कंपन्यांना विकू शकतात व चांगला नफा मिळवू शकतात.