हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Free Seed Distribution) करण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ सरकारकडून राज्यातील कांदा आणि भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारकडून कांदा, हिरवी मिरची, कोबी, हिरवा वाटाणा यांसह सर्व भाजीपाला पिकांचे बियाणे (Free Seed Distribution) शेतकऱ्यांना मोफत दिले जात आहे.
बियाणे वाटपासाठी (Free Seed Distribution) योगी सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीसाठी असमर्थ असल्याचा अर्ज भरून घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या फळबाग आणि भाजीपाला विकास विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यासाठी मंजुरी दिली जात आहे. यासाठी सरकारकडून बियाणे उत्पादक कंपन्यांसोबत बोलणी करत बियाणे उपलब्ध केले जात आहे. सरकारकडून उद्यान विभागाच्या राज्यभरातील कार्यालयांसमोर ही मोफत बियाणे वाटप योजना राबवण्यासाठी स्टॉल लावण्यात आले असून, मंजुरी दिलेल्या शेतकऱ्यांना ते वितरित केले जात आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील कांदा आणि फळभाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे.
हजारो शेतकऱ्यांना लाभ (Free Seed Distribution Onion, Chilli In Up)
उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ही मोफत बियाणे वाटप योजना सुरु केली आहे. 23 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या काळात आतापर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. असे यूपी सरकारकडून सांगितले जात आहे. याशिवाय सरकारकडून ही योजना राबवण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी मेळावे भरवले जात आहेत. दरम्यान, सरकारकडून संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांना एकूण बियाणे विक्रीच्या तुलनेत एकत्रित रक्कम अदा केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांनीही या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.