हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळा सुरू झालेला आहे. यावेळी फळ झाडांच्या रोपांची (Fruit Plant Seedlings) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मनरेगा योजने अंतर्गतही जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड (Fruit Orchard Establishment) होते. मात्र, अनेकदा शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण रोपे (Quality Seedlings) मिळत नाहीत, किंवा मिळाली तरी त्यांच्या किमती फार जास्त असतात.
या समस्येवर उपाय म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या (MPKV Rahuri) गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रात (Zonal Agriculture Research Station, Ganeshkhind) विविध फळझाडांची रोपं (Fruit Plant Seedlings) विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.
विद्यापीठामार्फत विकल्या जाणाऱ्या रोपांची खात्री असल्याने शेतकर्यांना फसवणुकीची भीती वाटण्याची गरज नाही. यासोबतच, रोपांची किंमतही बाजारपेठेपेक्षा स्वस्त आहे.
शेतकर्यांनी फळझाडांची लागवड करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठापासून मिळणाऱ्या खात्रीच्या रोपांचा (Fruit Plant Seedlings) लाभ घेऊन चांगल्या दर्जाची फळं उत्पादन करावी, व भरपूर लाभ घ्यावा.
उपलब्ध फळझाडांची रोपे आणि त्यांच्या किमती (Fruit Plant Seedlings)
- आंबा (कलम): केसर, अभिरूची, हापूस (80 रुपये प्रति रोप)
- सिताफळ (कलम): फुले पुरंदर (50 रुपये प्रति रोप)
- डाळिंब: भगवा, सुपर भगवा (30 रुपये प्रति रोप)
- पेरू (कलम): सरदार (एल – 49) (60 रुपये प्रति रोप)
- अंजीर (कलम): पुना फिग, फुले राजेवाडी (40 रुपये प्रति रोप)
- नारळ: बाणवली, प्रताप (120 रुपये प्रति रोप)
- कागदी लिंबू: साई सरबती, फुले सरबती (35 रुपये प्रति रोप)
- गुलछडी फूल कंद: फुले रजनी, फुले रजत (4 रुपये प्रति कंद)
- अॅस्टर बियाणे: गणेश फुले पिंक, निळा आणि पांढरा (8000 रुपये प्रति किलो)
इथे संपर्क साधा
राहुरी कृषी विद्यापीठ
गणेशखिंड कृषी संशोधन केंद्र, पुणे
संपर्क क्रमांक: 020-29999067
रोपं खरेदी करण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 4.30 पर्यंत संपर्क साधा.