हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील सर्वच भागांमध्ये सध्या सेंद्रिय शेतीचे (Gandul Khat Business) महत्व वाढले आहे. शेतकरी स्वतःहून आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळत आहे. ज्यामुळे सध्या गांडूळ खत निर्मितीला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याच गांडूळ खत निर्मितीच्या व्यवयासातून प्रगती साधलेल्या शेतकरी अब्दुल अहद यांच्या यशस्वी गांडूळ खत निर्मिती व्यवसायाबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे अब्दुल अहद हे आपल्या गांडूळ खत निर्मिती व्यवसायातून (Gandul Khat Business) वार्षिक 1.5 कोटींचा टर्नओव्हर करत आहे.
फळशेतीतून गांडूळ खतनिर्मितीकडे (Gandul Khat Business 1.5 Crore Turnover)
शेतकरी अब्दुल अहद हे जम्मू-काश्मीर राज्यातील अंनतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहे. अब्दुल अहद हे यापूर्वी सफरचंद फळबाग शेती तसेच भाजीपाला करत होते. मात्र, एका प्रवासादरम्यान त्यांना गांडूळ खत निर्मितीबाबतची (Gandul Khat Business) माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्याबाबत सविस्तर माहिती मिळवत, त्यात उतरण्याचा निर्णय घेतला. अर्थात 2002-03 मध्ये त्यांनी सर्वप्रथम गांडूळ खत निर्मिती उद्योगात पाऊल ठेवले. गेल्या 20 वर्षांपासून ते या व्यवसायात यशस्वीपणे पाय रोवून उभे आहेत. सुरुवातीच्या काळात गांडूळ खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये फारशी जागरूकता नसल्याने, त्यांना या व्यवयसायात अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, 20 वर्षानंतर त्यांनी या व्यवसायात स्वतःचे एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.
झेलला अपयशाचा काळ
वर्ष 2013 पर्यंत शेतकरी अब्दुल अहद गांडूळ खत निर्मिती व्यवसायात (Gandul Khat Business) फारसा जम बसवता आला नाही. मात्र, 2013 पासून सेंद्रिय शेतीचा काळ सुरु झाल्याने, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीला हळूहळू फळ मिळण्यास सुरुवात झाली. त्यांनी 2013 पासून आपल्या युनिटमधून अधिक गांडूळ खत निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यातच मागणी वाढल्याने त्यांच्या व्यवसायाने जोर पकडण्यास सुरुवात केली. ज्यामुळे त्यांना 2024 अर्थात मागील दहा वर्षातील व्यवसायातील अनुशेष भरून काढण्यास मदत झाली.
किती करतायेत उत्पादन?
शेतकरी अब्दुल अहद सांगतात, व्यवसायात एक पडता काळ अनुभवल्यानंतर गेल्या दशकभरात, आपल्या गांडूळ खत निर्मिती व्यवयासाने चांगलाच वेग घेतला आहे. सध्याच्या घडीला ते आपल्या 15 कप्प्याच्या मोठ्या शेडमध्ये 1000 बेडच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती करत आहेत. ज्याद्वारे दररोज 50 किलोच्या 100 ते 120 गोण्या गांडूळ खत निर्मिती होत आहे. ज्यास त्यांना प्रति गोणी 500 रुपये इतका दर मिळत आहे.
किती मिळतंय वार्षिक उत्पन्न?
अर्थात दिवसभरात 100 गोणी गांडूळ खत निर्मितीतून 50,000 हजाराचे उत्पादन तयार होते. सध्या त्यांची अनंतनाग जिल्ह्यात दोन आणि जम्मूमध्ये एक युनिट आहे. ज्यातून त्यांना मागील आर्थिक वर्षात 1.5 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर झाला आहे. असे ते सांगतात. पुढील आर्थिक वर्षात आपल्या व्यवसायाचा टर्नओव्हर 2 कोटींपर्यंत वाढवण्याचा आपला मानस असल्याचे ते आवर्जून सांगतात.