Gandul Khat Export : अकोल्यातून गांडूळ खत दुबईला निर्यात; देशातील पहिलाच अभिनव उपक्रम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला व्यावसायिकतेची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात (Gandul Khat Export ) भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक प्रकल्प निर्माण केला असून, याच माध्यमातून प्रथमच शेणातून तयार करण्यात आलेले (व्हर्मी कंपोस्ट) गांडूळखत आखाती देशांत निर्यात करण्यात आले आहे. देश पातळीवरील हा अभिनव उपक्रम मानला जात आहे. कृषी विद्यापीठाने शेणखतापासून तयार केलेले गांडूळखत व वर्मिवाशचा (Gandul Khat Export) 28 टनांचा एक कंटेनर नुकताच दुबईला पाठविण्यात आला आहे.

दररोज दोन टन उत्पादनाचे उदिष्ट (Gandul Khat Export From India)

दरम्यान, कृषी विद्यापीठात सध्या दररोज दोन टन गांडूळखत (Gandul Khat Export) उत्पादनाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विद्यापीठ, शेतकरी, उद्योजकता विकास फोरमचे सदस्य, कृषी पदवीधर या माध्यमातून गांडूळखत परदेशात पाठवण्यात येत असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य आहे. असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने म्हटले आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत दुसरा कंटेनर पाठविण्यात येणार आहे. असेही विद्यापीठाने म्हटले आहे.

देशी गायींवर करणार भृणप्रत्यारोपण

कृषी विद्यापीठात देशी गायींची संख्या वाढविण्यात येणार आहे. म्हणूनच सायवाल गाईची निवड करून यासाठीचे भृणप्रत्यारोपण करण्यात येत आहे. कृत्रिम रेतन करून कालवडींचा जन्म झाला आहे. ही गाय प्रतिदिन 15 ते 16 लिटर दूध देत आहे, गीर, लालकंधार, डांगी व गौळाऊ, आदी गार्डचे येथे संगोपन करण्यात आले आहे. एका गाईच्या शेणापासून अडीच टन गांडूळखत आणि व्हर्मीवॉशही मिळतो. 10 रुपये किलो याप्रमाणे वर्षाला एका गाईपासून 25 हजार आणि गोमूत्रापासून मिळणाऱ्या व्हर्मीवॉशचे पाच हजार रुपये असे 30 हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय उरलेल्या शेणाचीही विक्री करता येईल.

शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध

दरम्यान, विदर्भातील पशुधनाचा विचार करता, अत्यल्प दूध उत्पादकतेमुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन फायदेशीर ठरत नसताना उपलब्ध शेण व गोठ्यातील वाया जाणारे मलमूत्र तथा चाऱ्याचे अवशेष, इत्यादींच्या प्रभावी वापरातून गांडूळखत तथा वर्मीवॉशची निर्मिती आर्थिक लाभ देणारी ठरत असून, गुणवत्तापूर्ण गांडूळ खत निर्यातीसाठी आता विद्यापीठाच्या सहयोगातून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाला आहे.

error: Content is protected !!