garlic price : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! लसणाचे भाव घसरले; मिळतोय फक्त ‘इतका’ भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

garlic price : मागच्या काही दिवसापासून लसणाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. अनेक शेतकरी लाखो रुपये कामवत आहेत. असे असतानाच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी लसणाचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना फायदा देत होते मात्र अचानक पुन्हा आता लसणाचे भाव कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. (garlic price)

गेल्या वर्षी लसणाचे जादा उत्पादन झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारात त्याचे दर खूपच घसरले होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना खर्चही वसूल करता आला नाही. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा स्थितीत तो कर्जाखाली दबला गेला. विशेषत: मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांना भाव घसरल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी लसूण रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. यामुळेच यावर्षी शेतकऱ्यांनी नुकसानीच्या भीतीने लसणाची अत्यल्प लागवड केली, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत लसणाचे उत्पादन घटले.

मंडईंमध्ये लसणाची आवक कमी झाल्याने दरात वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जोपर्यंत नवीन पीक येत नाही, तोपर्यंत भाव पडणार नाहीत. पण, यंदा लसूण विकून शेतकरी श्रीमंत झाला. गतवर्षी झालेल्या नुकसानीची भरपाईही अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी लसूण विकून भरून काढली.

या ठिकाणी मिळतोय स्वस्त लसूण

उच्च किंमत असतानाही देशात अनेक ठिकाणी लसूण अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. सध्या देशात सर्वात स्वस्त लसूण जयपूरमध्ये उपलब्ध आहे. येथे एक किलो लसणाचा दर १४० रुपये आहे. यानंतर बिहारची राजधानी पाटणा येथे लसूण स्वस्तात विकला जात आहे. पाटण्यात एक किलो लसणासाठी लोकांना १४१ रुपये मोजावे लागतात.

या ठिकाणी पाहा लसणाचे बाजारभाव

तुम्हाला जर लसणाचे रोजचे बाजारभाव पाहायचे असतील तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. या अँपच्या माध्यमातून तुम्ही रोजचे लसणाचे बाजारभाव पाहू शकता. त्याचबरोबर इतर शेतमालाचे एकदम अचूक बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हा अँप इंस्टाल करा.

error: Content is protected !!