Garlic Rate: तुटवड्यामुळे लसणाला मिळतोय उच्चांकी भाव; अफगाणिस्तानातून करावी लागतेय आयात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर (Garlic Rate) मिळत आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात (Garlic Import) करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील (Afghanistan)  लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर (Garlic Rate) काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आले आहे.

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांत लसणाची लागवड (Garlic Cultivation)मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेले दोन वर्ष लसणाला दर मिळाले नव्हते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्र कमी करून अन्य पिकांची लागवड करण्यास प्राधान्य दिले. महाराष्ट्रासह देशभरातील सर्व राज्यांतील बाजारपेठेत लसणाचा तुटवडा जाणवत आहे.

मार्केट यार्डातील फळभाजी बाजारात परराज्यातून लसणाच्या पाच ते सात गाड्यांची आवक होत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन लसणाचा हंगाम सुरू होईल. फेब्रुवारीत आवक वाढल्यानंतर लसणाचे दर (Garlic Rate) कमी होतील. चांगले दर मिळाल्याने उतरेकडील शेतकऱ्यांनी यंदा लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे, अशी माहिती आहे.

राज्यातील लसणाचे बाजारभाव (Garlic Rate Today)

आजच्या ताज्या दरांनुसार, महाराष्ट्रात लसणाची सरासरी किंमत 25,500 रूपये/क्विंटल आहे. कमीत कमी  बाजारभाव 12,000 रूपये/क्विंटल आहे. सर्वात जास्तीत जास्त बाजारभाव 35,000 रूपये/क्विंटल आहे.

आज पुणे बाजारात लसणाला जास्तीत जास्त 35,000 रूपये/क्विंटल, कमीतकमी 12,000 रूपये/क्विंटल आणि सरासरी 23,500 रूपये/क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.

मोशी बाजार समितीत लसणाला जास्तीत जास्त 25,000 रूपये/क्विंटल, कमीतकमी 25,000 रूपये/क्विंटल आणि सरासरी 25,000 रूपये/क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.

काल 25 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्रपूर (गांजवड) बाजार समितीत लसणाला सर्वाधिक 38,500 रूपये प्रति क्विंटल बाजारभाव (Garlic Rate) मिळालेला होता.

error: Content is protected !!