शेतीसोबत जोडधंदा ! गोट बँकेची स्थापना आणि तब्बल 94 कोटींचा प्रस्ताव, काय आहे राज्य सरकारचे प्लॅनिंग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोन्द्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 500 महिलांना सहभागी करून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कारखेडा गोट प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोट बँकेच्या संकल्पनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

यावेळी बोलताना केदार म्हणाले, मडग्याळ मेंढी च्या जातीला केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त झाले आहे. माडग्याळ मेंढी ची जात महाराष्ट्रात प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. इतर देशातून उच्च जातीच्या शेळ्या राज्यात आणण्यात येणार आहेत. लोकरीचे विविध प्रकारची उत्पादने निर्माण करून विक्रीला उपलब्ध करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी केदार यांनी सांगितले.

महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली

पशुपालकांपर्यंत शेळी मेंढी विमा योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी सर्व प्रक्षेत्र व्यवस्थापकासह विभागाने प्राधान्य द्यावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी प्रक्षेत्र व्यवस्थापक यांनी आपापल्या प्रक्षेत्राची माहिती सांगून अधिक विकसित करण्यासाठी विविध सूचना केल्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता अधिकृत भांडवल शंभर कोटी रुपये झाला आहे. तसेच महामंडळाची सरासरी वार्षिक आर्थिक उलाढाल 40 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे यापूर्वी राज्यात दहा प्रक्षेत्र होते ते आता 16 झालेत.

94 कोटींचा प्रस्ताव

विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर चे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी 94 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये पशुधन खरेदी करणे, नवीन वाडे बांधकाम, कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे, मुरघास निर्मिती ,यंत्रसामुग्री ,शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम व शेतकरी निवास्थान जमीन विकास ,सिंचन सुविधा ,विहीर पाईपलाईन इलेक्ट्रिक मोटार इत्यादी. ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे व चारा कापणी यंत्र, वैरण साठवणूक गोडाऊन ,सिंचन सुविधा विहीर, शेळी मेंढी खाद्य कारखाना कार्यालय इमारत बांधकाम, अधिकारी कर्मचारी निवास बांधकाम प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामग्री ,सुरक्षा भिंत , अंतर्गत रस्ते, अल्ट्रासोनोग्राफी युनिट, फिरते शेळी-मेंढी चिकित्सालय वाहन, खरेदी फॉडर ब्लॉक मेकिंग युनिट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!