Goat Breed: ‘या’ जातीची शेळी पाळा; दूध उत्पादनातून बंपर नफा कमवा!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या शेळीच्या ठेंगण्या किंवा लहान जातीचे (Goat Breed) पालन करण्याची क्रेझ शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. कारण या शेळ्यांची काळजी घेण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. आणि या शेळ्या कमी खर्चात सुद्धा चांगला नफा देतात. अशीच एक शेळीची जात आहे ‘नायजेरियन ड्वार्फ’ (Nigerian Dwarf Goat). शेळीची ही जात (Goat Breed) दिसायला अगदी लहान असली तरी नफा देण्याच्या दृष्टीने इतर जातीच्या शेळ्यांपेक्षा खूपच सरस आहे, आणि या शेळ्यांच्या संगोपनात फारसा पैसा खर्च करावा लागत नाही. जाणून घेऊ शेळीच्या या जातीविषयी सविस्तर माहिती.

शारीरिक ठेवण: नायजेरियन ड्वार्फ शेळी (Goat Breed) ही पश्चिम आफ्रिकन वंशाची शेळीची जात आहे. या शेळ्या खूप मजबूत आणि काटक असतात. या शेळ्या सुमारे 10 वर्षे जगतात. नावाप्रमाणेच या शेळ्या उंचीला ठेंगण्या (Dwarf Goat) आणि काळ्या, पांढऱ्या, तपकिरी, लाल आणि सोनेरी अशा विविध असतात. पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे सरासरी वजन 17 ते 25 किलोपर्यंत असते, लांबी 24 ते 30 इंच असते आणि उंची 16 ते 20 इंच असते.

प्रजोत्पादन माहिती: नायजेरियन ड्वार्फ शेळ्यांचा (Goat Breed) प्रजनन दर इतरांपेक्षा जास्त असतो. ते वर्षभर प्रजनन करू शकतात. एक शेळी सरासरी 2 ते 4 पिलांना जन्म देते. ते साधारण 6 ते 7 महिन्यांत माजावर येतात आणि दूध देऊ लागतात. या शेळ्यांचा गर्भधारणा कालावधी 145 ते 153 दिवसांचा असतो.  

सर्वाधिक दूध उत्पादन क्षमता: नायजेरियन ड्वार्फ शेळी ही मांस आणि दूध उत्पादनासाठी सर्वोत्तम जात मानली जाते. इतर शेळ्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत जास्त दूध उत्पादक (Highest Milk Producing Goat) आहेत.  ही शेळी (Goat Breed) दररोज 1.8 ते 2 लिटर दूध देते. याशिवाय त्याचे मांसही बाजारात चांगल्या दराने विकले जाते. त्यांचे पालन करून शेतकरी बांधव दर महिन्याला बंपर नफा मिळवू शकतात.

संगोपन: या शेळ्यांसाठी तुम्ही बांधलेले आवार अतिशय स्वच्छ असावे. वेंटिलेशन प्रणाली आणि सांडपाण्याचा प्रवाह चांगला असावा. शेळ्यांना पुरेशा प्रमाणात पोषक आहार देण्याचा प्रयत्न करा. त्यांना हिरव्या भाज्या खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय या शेळ्यांना पुरेसे पाणी द्यावे लागते.

error: Content is protected !!