Goat Breeds : ‘ब्लॅक बेंगाल शेळी’ मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध; वाचा… ‘या’ जातीची वैशिष्ट्ये?

Goat Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेळीपालन व्यवसाय (Goat Breeds) हा भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा दुग्धव्यवसायानंतर दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे काही सकारात्मक पैलू पाहिले तर यात लागणारी जागा ही कमी लागते. तसेच पशुपालनाच्या दृष्टिकोनातून खर्च देखील खूप कमी लागतो. त्यामुळे कमी खर्चात चांगला नफा देण्याची क्षमता शेळीपालन (Goat Breeds) व्यवसायात आहे.

शेळीपालनाकडे अनेकांचा ओढा (Goat Breeds For Farmers)

परिणामी, शेळीपालन व्यवसायाकडे आता तरुण सुशिक्षित बेरोजगार देखील मोठ्या प्रमाणावर वळले असून, काही तरुणांनी करिअर म्हणून शेळी पालन व्यवसायाची निवड केलेली दिसते. परंतु, शेळीपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्याकरिता शेळ्यांच्या दर्जेदार आणि जातिवंत जातींची (Goat Breeds) निवड करणे तितकेच महत्त्वाचे असते. भारतामध्ये शेळ्यांच्या अनेकविध जाती आहेत. परंतु त्यातील उत्तम जातींची निवड ही खूप महत्त्वाचे ठरते. याच अनुषंगाने आज आपण शेळीच्या ‘ब्लॅक बेंगाल शेळी’ या महत्त्वपूर्ण जातीविषयी माहिती घेणार आहोत.

ब्लॅक बेंगाल शेळीची शरीर रचना

ब्लॅक बेंगाल या जातीची शेळी, शेळी पालनासाठी खूप फायद्याची आहे. ही शेळी आकाराने लहान असते व भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये आढळून येते. या जातीच्या शेळीची शरीर रचना पाहिली तर तिचे पाय लहान आणि चेहरा गोल असतो व त्यासोबतच नाकाची रेषा सरळ असून ती दाबली गेलेली असते. याशिवाय या शेळीचे सगळ्यात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ही कोणत्याही हवामानात तग धरून राहते. त्यामुळे हवामान बदलाचा तितकासा परिणाम या शेळीवर होत नाही.

कसा होतो आर्थिक फायदा?

ब्लॅक बेंगाल शेळी ही मांस उत्पादनासाठी खूप महत्त्वाची असून, एका शेळी पासून 18 ते 20 किलोपर्यंत मांस उत्पादन मिळू शकते. साधारणपणे आठ ते दहा महिन्यात या जातीची शेळी प्रौढ होते. ब्लॅक बेंगाल शेळी ही दूध उत्पादनासाठी देखील महत्त्वाचे असून, खूप चांगल्या दर्जाचे दूध या जातीच्या शेळीपासून मिळते. जवळजवळ तीन ते चार महिन्यांपर्यंत ही शेळी दूध देते. तसेच दररोज अर्धा लिटरपर्यंत एक शेळी दूध देऊ शकते.

दरम्यान, ब्लॅक बेंगाल शेळीच्या गर्भधारणेचा कालावधी पाहिला तर तो सर्वसाधारणपणे बारा महिन्यानंतरचा असतो. तिचे ऋतुचक्र हे 18 ते 20 दिवसांच्या असते. यामध्ये या जातीच्या शेळीला गर्भधारणा होत असते. मांस उत्पादनासाठी ही शेळी प्रसिद्ध असून, एका वर्षामध्ये तीन पिल्लांना जन्म देण्याची क्षमता या जातीच्या शेळीमध्ये आहे.