Goat Breeds : जखराना शेळी देते अधिक करडांना जन्म; शेळीपालनात होईल आर्थिक भरभराट!

0
5
Goat Breeds For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशामध्ये विविध प्रजातीच्या शेळ्या (Goat Breeds) पाळल्या जातात. मात्र, त्या-त्या भागातील विशिष्ट हवामान आणि परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी शेळीपालनासाठी योग्य त्या जातीची निवड करणे आवश्यक असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या एका महत्वाच्या प्रजातीची (Goat Breeds) माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला शेळीपालन व्यवसायात अधिकचे आर्थिक उत्पन्न मिळवण्यास मदत होणार आहे.

जखराना शेळीचे मूळस्थान? (Goat Breeds For Farmers)

शेळीपालन उद्योगात प्रामुख्याने जखराना शेळीच्या जातीला (Goat Breeds) विशेष महत्व आहे. ही शेळी प्रामुख्याने राजस्थान या राज्यातील अलवर भागात आढळते. या भागात असलेल्या जखराना गावाच्या नावावरून या शेळीला ‘जखराना शेळी’ असे नाव पडले आहे. हरियाणा राज्यात देखील ही शेळीची जात आढळून येते.

शेळीपालन करताना प्रामुख्याने शेळ्या या मांस आणि दूध उत्पादनासाठी पाळल्या जातात. त्यामुळे एखादी शेळीची जात ही एकाच वेळी तीन पिल्लांना जन्म देत असेल. तर अशा प्रजातीच्या शेळीच्या पालनातून शेळीपालन उद्योगात मोठ्या प्रमाणात भरभराट होते. अधिक पिलांना देण्याची ही क्षमता जखराना शेळीमध्ये असल्याने, ती शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते.

काय आहेत वैशिष्ट्ये?

जखराना शेळी ही पूर्णतः काळ्या रंगाची शेळी असते. या शेळीची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिचा असलेला संपूर्णतः काळा रंग होय. मात्र, या जातीच्या शेळीच्या (Goat Breeds) कानावर आणि तोंडावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. याशिवाय जखराना शेळीच्या अंगावर अन्य कोणताही डाग तुम्हाला दिसून येणार नाही.

जखराना शेळीच्या बोकडाचे वजन हे 55 किलो तर शेळीचे वजन हे 45 असते. बोकडाची उंची 84 सेमी तर शेळीची उंची 76 सेमी असते. त्यामुळे ही शेळी मांस उत्पादनासाठी प्रभावी जात मानली जाते. विशेष म्हणजे या शेळीच्या बोकडाला व्यवस्थित खुराक असलेले त्याचे वजन ६० किलोपर्यंत वाढते.

किती देते दूध?

जखराना शेळी ही दररोज जवळपास एक ते दीड लीटरपर्यंत दूध देते. या प्रजातीच्या शेळीबाबत केंद्रीय शेळी संशोधन केंद्राने दावा केला आहे की, या प्रजातीची शेळी ही 90 दिवसांच्या काळात 172 लीटर दूध देते. ही शेळी जवळपास पाच महिने दूध देते. या शेळीची विशेषतः म्हणजे या प्रजातीच्या ६० टक्के शेळ्या या तीन पिलांना जन्म देतात. त्यामुळे अधिक दूध देण्याची क्षमता, अधिक कालावधीपर्यंत दूध देण्याची क्षमता आणि अधिक पिलांना जन्म देण्याची क्षमता अशा तिन्ही क्षमता या प्रजातीच्या शेळीमध्ये आढळून येतात. त्यामुळे शेळीपालनासाठी ही प्रभावी शेळी मानली जाते.